नागपूरची मुलगी आणि गोंदियाचा मुलगा यांच प्रेम जुडल, आईला सांगितल, मग प्रेमी युगुलाने केली आत्महत्या.
●गोंदिया येथे हॉटेल एव्हर ग्रीनमध्ये एका प्रेमी युगलाने केली आत्महत्या.
●प्रेमी युगलाचा आत्महत्येने गोंदीया जिल्हात खळबळ.
●प्रेमी युगलानी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, याचा पोलिस घेत आहेत शोध.
✒गोंदिया जिल्हा प्रतिनिधी✒
गोंदिया:- गोंदिया येथून एक खळबळजनक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. शहरातील हॉटेल एव्हर ग्रीनमध्ये एका प्रेमी युगलाने व्हेलेटाईन डे च्या वीक मध्ये आत्महत्या केल्याने संपुर्ण गोंदिया जिल्हात एकच खळबळ उडाली आहे. मृतक मुलगी नागपुर येथील रहवासी असुन तिचे वय 21 वर्ष आहे. तर मृतक मुलगा गोंदिया येथील रहवासी होता त्यांचे वय 22 वर्ष होते. आत्महत्या करण्यापुर्वी मृतक तरुणाने आपण हॉटेलमध्ये असल्याची माहिती आईला दिली होती. लगेच आईने हॉटेलमध्ये धाव घेतली. वेटरच्या मदतीने तिने रुममध्ये जाऊन पाहिले असते प्रेमी युगुल बेशुद्धावस्थेत होते. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. प्रेमी युगुलाने आपली जिवन यात्रा का संपवली याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
नागपुरातील 21 वर्षीय रोहिणी पवार आणि गोंदियातिल 22 वर्षीय आकाश छेतीया यांच प्रेम होते. ते एकमेकाना जीवापाड प्रेम करायचे गुरुवारी रात्री या दोघानी आत्महत्या केली. याची माहिती पोलिस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दोघांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल कुठल्या कारणामुळे उचललं, याचा शोध गोंदिया ग्रामीण पोलिस घेत आहेत.
सर्वसामान्यांच्या समस्या, सर्व सामान्यांचे प्रश्न
सर्वसामान्यांच्या बातम्यांनाच, आम्ही देतो महत्त्व
आज आपल्या विश्वासाबरोबरच मीडिया वार्ता न्यूजला गरज आहे, आपल्या मदतीची. आपली छोटीशी मदत या फेक न्यूजच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या बातम्यांना वाचा फोडून प्रामाणिकपणे काम करण्यासाठी लाखमोलाची ठरू शकते.