नवेगाव पांडव येथे गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या.
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*
नागभीड -तालुक्यातील नवेगाव पांडव येथील हुमा केवळराम पांडव वय ३८ वर्षे याने स्वतःच्या राहत्या घरी आज दिनांक १२/०२/२०२२ शनिवार ला दुपारी बारा ते साडेबारा वाजता च्या दरम्यान आत्महत्या केली . प्राप्त माहितीनुसार हुमा केवळराम पांडव हा विवाहित असून त्याला दोन भाऊ आणि आई-वडील आहेत. त्याच्या जवळ पाच एकर शेती असून हुमा पांडव यांच्यावर बँकेचा चालू कर्ज तसेच विविध फायनान्स कंपनी चा कर्ज आहे. मार्च महिना लागताच कर्जासाठी बँक तसेच इतर संस्था तगादा लावतात त्यामुळे कर्ज फेडायचे कुठून, यावर्षी शेतामध्ये कर्जफेड करण्याइतका उत्पन्न झालेला नाही .त्यामुळे तो सतत उदासीन राहायचा आणि आज शनिवारी ला त्याने स्वतःच्या राहत्या घरी आत्महत्या केली अशी माहिती गावकऱ्यांकडून मिळालेली आहे. घटनास्थळी पोलिस हजर होऊन पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले . पुढील तपास ठाणेदार मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार देवेंद्र येरमे हे करीत आहेत.