शिवसेना(उ.बा.ठा.)तळा तालुका प्रमुख पदी कोणाची वर्णी लागणार? नवनियुक्त प्रमुखावर येणार मोठी जबाबदारी.
✍🏻किशोर पितळे✍🏻
तळा तालुका प्रतिनिधी
मो.९०२८५५८५२९
तळा :- तळा तालुक्यातील शिवसेना (उबाठा) कशी तरी तग धरून उभी राहिली होती. तालुक्यातील २६ ग्रामपंचायती पैकी एकमेव पंचायत कट्टर शिवसैनिक तथा माजी सरपंच नाना दळवी यांनी टिकून ठेवली होती आणी पडत्या काळात स्वबळावर आणून दाखवली तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे व राष्ट्रवादी पक्षाचे बळ अधिकअसूनही स्वकष्टाने तन,मन, धन खर्च करून पक्षाची भानंग ग्रामपंचायत शिवसेना (उबाठा)चे वर्चस्व सिध्द करून दाखवले परंतू पक्षा कडून निवडणूकीत कोणत्याही प्रकारचे अपेक्षीत बळ न मिळाल्याने तत्कालीन तालुका प्रमुख नाना दळवी यांनी पदाधीकारी यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त करुनआपल्या सहकार्यासह राजीनामा पक्षश्रेष्ठीं कडेदेऊनवविभागातीलकार्यकर्त्यांनी निर्णय घेऊन राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करून जय महाराष्ट्र केला.त्यामुळेतालुक्यातील शिवसेना (उबाठा) संपली आहे. सद्य परिस्थीला तालुका प्रमुखाला वारस नसल्याने व नियुक्ती न केल्याने शिवसैनिकांत नाराजी खदखदत आहे. त्यामुळे वेगळी शंका निर्माण होत आहे. काही कट्टर शिवसैनीकांत मध्ये इतके वर्ष एकनिष्ठ असलेले शिवसैनिकां मधून तालुकाप्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार ? या कडे लक्ष लागून राहिले असून राष्ट्रवादी व शिंदेगटातून स्वगृही परतलेले विलास ठसाळ,आमले, साळवी अशी ईच्छुक असल्याचे नाक्यावर कानोसा ऐकावीत येत आहे. परंतू नवनियुक्त प्रमुखावर येत्या लोकसभा व ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत विजयश्री खेचून आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.त्यावरच विधानसभा निवडणूकीतील भावी आमदार उमेदवाराचे हात बळकट होणार आहेत. पक्ष श्रेष्ठी जून्यानां संधी देणार का? कि परिपक्व शिवसैनिकांच्या गळ्यात माळ घालणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.