माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी निश्चित करुन दिलेल्या सात कलमी कृती कार्यक्रमाची नागपूर महानगरपालिकेमध्ये काटेकोर पद्धतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश
✍🏻मंजुषा सहारे ✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो 9373959098
नागपूर :- महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी निश्चित करुन दिलेल्या सात कलमी कृती कार्यक्रमाची नागपूर महानगरपालिकेमध्ये काटेकोर पद्धतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. आयुक्तांनी स्पष्ट केले की प्रत्येक झोन कार्यालयामध्ये स्वागत कक्ष तयार करण्यात यावे. तसेच जुने रेकॉर्ड सहा बंडल पद्धतीने ठेवण्यात यावी आणि झोनमधील महत्वाच्या प्रकल्पांना भेट द्यावी. तसेच नागरिकांच्या तक्रारींवर लवकर दिलासा मिळावा यादृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी बैठकीत दिले.
मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणी व नियोजनाच्या संदर्भात आयुक्तांनी बुधवारी (ता. १२) सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मनपा मुख्यालतील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभाकक्षात बैठक पार पडली. बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर, उपायुक्त श्रीमती विजया बनकर, उपायुक्त सर्वश्री विजय देशमुख, मिलींद मेश्राम, प्रकाश वराडे, गणेश राठोड, अशोक गराटे, परिवहन व्यवस्थापक श्री. विनोद जाधव, उपायुक्त उपायुक्त डॉ. रंजना लाडे, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, सहायक आयुक्त सर्वश्री श्याम कापसे, हरीश राऊत, घनश्याम पंधरे, नरेंद्र बावनकर, विजय थुल, विकास रायबोले यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.