काठमांडू :नेपाळमधील काठमांडू आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करताना एक विमान कोसळलं आहे. विमानात ६७ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर होते. हे विमान यूएस-बांगला एअरलाइनचे होते. त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्टच्या पूर्वेकडील भागात जाऊन हे विमान कोसळल्याची माहिती काठमांडू पोस्टने दिली आहे. जळालेल्या अवस्थेतील काही मृतदेह विमानाच्या अवशेषांतून बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र, मृतांची नेमकी संख्या अद्याप स्पष्ट नाही. टीव्ही रिपोर्ट्सनुसार, या अपघातात सुमारे २० लोकांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे.
हे विमान ढाकाहून काठमांडूला येत होते. लँडिंगच्या वेळी विमान रनवेच्या दिशेने झुकले आणि जवळच्या फुटबॉल मैदानावर जाऊन आदळले. विमानातून धुराचे लोट निघत आहेत. या अपघातानंतर विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली असून अपघातग्रस्त विमानातील प्रवाशांचे बचावकार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
अद्याप १७ जखमी प्रवाशांना वाचवण्यात आलं आल्याची माहिती पर्यटन मंत्रालयाचे सहसचिव सुरेश आचार्य यांनी दिली. बचावकार्यात नेपाळच्या सैन्याचीदेखील मदत घेण्यात आली आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here