Bhodubaba, who robbed many people by showing the lure of money, is absconding.
Bhodubaba, who robbed many people by showing the lure of money, is absconding.

पैशांचा पावसाचं आमिष दाखवून अनेक लोकांची लूट करणारा भोदूबाबा फरार.

 Bhodubaba, who robbed many people by showing the lure of money, is absconding.

✒️दयानंद सावंत प्रतिनिधी✒️
पालघर, दि.11 मार्च:- येथे अनेक दिवसा पासुन लोकांना लुटना एक भोदू बाबा वास्तव्यास आहे. बनवा बनवीच्या गोरखधंद्यामुळे त्याने अनेक लोकांना चांगलंच फावलं. पैशांचा पाऊस पाडतो असं सांगून त्यानं आजवर अनेकांची फसवणूक केलीय. त्यामुले या भोदू बाबा विरुद्ध पालघर पोलिसात अनेकाने तक्रार दाखल केली आहे. म्हणून पालघर पोलिस या भोंदू बाबांच्या मागावर आहेत.

लोकांना फसवणूक करुन लुटणा-या या भोदूबाबाचं नाव आहे रमेश राठड. पालघरच्या या बाबानं आजवर अनेकांची फसवणूक केलीय. हा बाबा लोकांना झटपट श्रीमंत करण्याचं आमिष दाखवातो. पैशांचा पाऊस पाडतो असं सांगून अडल्या नडलेल्याला आपल्या जाळ्यात ओढतो. विधीसाठी त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. मग पैशांचा पाऊस पाडण्यावेळी त्याची टोळी सक्रिय होती.

अचानक पोलिसांची धाड पडली असं भासवून हा बाबा ग्राहकाला पळून जाण्यास भाग पाडतो. मग उरलेलं काम त्याची टोळी चोख पार पाडते. या बाबाची काळी कृत्य समोर आल्यानंतर त्याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झालाय. आता पोलिस या भोंदू बाबाचा शोध घेताये आहेत

रमेश राठड या भोंदू बाबानं आजवर अनेकांची फसवणूक केलीय. पैशांचा पाऊस पडेल या आशेनं कित्येकांनी बाबावर पैशांची उधळण केली आहे. पण हा चलाख, संधीसाधू बाबा लोकांना हातोहात गंडवतो आहे. खरं तर पुरोगामी महाराष्ट्रात सुशिक्षित लोकही अशा भुलथापांना फसतात ही बाब मनाल पटण्याजोगी नाही. त्यामुळे तुम्ही अशा फसव्या आमिषाला बळी पडू नका. सतर्क राहा. असे आव्हान पोलिसांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here