Fire in the tipper. Burning ashes.
Fire in the tipper. Burning ashes.

रेती भरण्यासाठी जाणारा टिप्पर मध्ये आग. टिप्पत जळुन खाक.

Fire in the tipper. Burning ashes.

✒ आशीष अंबादे प्रतिनिधि ✒ 

अल्लीपुर, दि.12 मार्च:-आज वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपुर येथे रेती आणायला नदीवर जात असतांना टिप्पर पेटल्यामुळे खळबळ उडाली. गेल्या एक वर्षात अवैध रेतीची वाहतूक होत असताना आता काही रेती घाटांचे लिलाव झाल्याने राजरोजपणे वर्धा घाटाहून रेती आणायला जाणारा टिप्पर अचानक पेटला. चालकाने समयसूचकात दाखवल्याने तो वाचला. ही घटना आज शुक्रवार 13 रोजी सकाळी 10 वाजता गावाशेजारी घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले.

मिळालेल्या माहितीनुसार, पुलगाव येथील भारत नागपाल यांच्या मालकीचा टिप्पर चालक कानोली कात्री येथील रेती घाटावर जात जात असताना अल्लीपूर जवळ टिप्परच्या कॅबिनमधून धूर निघताना चालकाला दिसून आले. त्याने टिप्पर रस्त्याच्या कडेला लावून पाहणी केली असता वायरींग शॉर्ट झाल्याने आग लागल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने आग विझवण्याचा प्रयत्नही केला. मात्र, आग अजून भडकत होती. त्यामुळे चालकाने कॅबिनमधुन ऊडी घेऊन सुरक्षित स्थळ गाठले.

आग लागल्याची माहिती सरपंच नितीन चंदनखेडे यांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलिस विभाग, तहसीलदार, उपविभागीय अधिकार्‍यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली तसेच गावात सुरू असलेल्या महामार्गाच्या कामावरील पाण्याचे दोन टँकरही आग विझवण्यासाठी बोलवले. परंतु, टँकरच्या पाण्याला वेग नसल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले. काही वेळातच पोलिस निरीक्षक शैलेश शेळके, उप निरीक्षक स्वप्नील भोजगुडे चमूसह दाखल झाले. त्यानंतर हिंगणघाट येथील अग्निशमणदल दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा सुरू केला तोपर्यंत टिप्परने पेट घेतला होता. टिप्परचे टायर जळून खाक झाले होते. सुदैवाने डिझल टँकपर्यंत आग पोहोचण्यापूर्वीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अल्लीपूर पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here