Gas cylinder explosion at Arvi in ​​Wardha district. Ashes of the house.
Gas cylinder explosion at Arvi in ​​Wardha district. Ashes of the house.

वर्धा जिल्हातील आर्वी येथे गैस सिलिंडरच्या स्फोट. घराची राखरांघोळी.

या आगीत एक महिला जखमी,  घर पूर्णतः जळून खाक

Gas cylinder explosion at Arvi in ​​Wardha district. Ashes of the house.

✒आशीष अंबादे प्रतीनिधी✒
गिरड, दि.11 मार्च:- वर्धा जिल्हातील समुद्रपुर तालुक्यातील गिरड जवळील आर्वी गावात गॅस सिलेंडरच्या पाईप मधून गॅस लीक होऊन लागलेल्या आगीत घराची राखरांगोळी झाली. या आगीत एक महिला जखमी झाली. ही घटना गुरुवारी 12 सकाळी 7 वाजता घडली.या आगीत पूर्णतः घर जळून खाक झाल्याने दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आर्वी येथील संजय चौके यांच्या घरातील जीवनपयोगी वस्तू सह शेतातील धान्य जळून खाक झाल्याने कुटुंबं उघड्यावर आले आहे.

संजय चौके यांच्या पत्नी सकाळी गॅसवर चाय मांडायला गेली दरम्यान गॅस सुरु करतांना रेग्युलेटर नळीतून गँस लीक झाल्याने पेट घेतला आणि महिलेच्या अंगावरील वस्त्र पेटल्याने दुर्गा चौके जळाल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचार्थ गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले.सकाळी 7 वाजता दुर्गा चौके गॅसवर चाय मांडत होत्या दरम्यान घरात त्यांच्या सासू सीताबाई चौके आणि जाऊ कलावती चौके होत्या. दरम्यान गँस लीक होताच दुर्गा चौकेच्या अंगावरील कापड्यानी पेट घेतला.पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण घराला आपल्या कवेत घेतले. गावकऱ्यांना आगीचे लोंढे दिसताच संपूर्ण गावातील नागरिकांनी घराकडे धाव घेतली. आणि आगीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. गावात नळ योजना कार्यान्वित असून अपुरे पाणी प्रत्येकाकडे उपलब्ध असल्याने घराघरातून पाणी आणून गावकर्यांनी आग विजविली. मात्र गावकऱ्यांच्या डोळ्या समोर या आगीत संपूर्ण घराची राख रांघोडी झाली.

संजय चौके अल्पभूधारक शेतकरी असल्याने जोड व्यावसाय करून कुटुंबाचा गाडा चालवीत होता.दोन दिवसापूर्वी पन्नास हजार रुपये किमतीचे विक्रीसाठी कपडे आणले होते.जळून खाक झाले.दुर्गा चौके गावातील बचत समुहाच्या प्रेरिका असल्याने बचत समूहाची मासिक बचत पन्नास हजार रुपये रक्कम कपाटात होती. तर संजय चौके यांनी तूर विक्रीतून मिळालेले पन्नास हजार रुपये आणि एक लाख रुपये किमतीचे दागिने, कपडे आलामारीत ठेवले होते. तर 20 किंटल कापूस, तुरी, चणा, गहू, तांदूळ, अन्य धान्य या आगीत भस्मसात झाले.रोजच्या वापरातील कपडे, भांडे संपूर्णता घरातील लाकडी, लोखंडी साहित्य जळून कोळसा झाल्याने त्यांचे दहा लाखाचे नुकसान झाले. या आगीने संपूर्ण चौके कुटुंबाच्या स्वप्नाची राख रांगोळी केल्याने हे उघड्यावर आले आहे.झालेल्या नुसकानाचा पंचनामा करून शासनाने चौके कुटुंबियांची तातडीने मदत करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.घटनेची माहिती. गिरड पोलिसांनी मिळातच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला आहे.

या आगीच्या घटनेची माहिती प्रतिनिधी विलास नवघरे यांनी आमदार समिरभाऊ कुणावार यांना दूरध्वनीवरून देताच त्यांनी चौके कुटुंबावर ओढावलेल्या संकटावर दुःख व्यक्त करून त्यांनी घा घटने संबधी संबंधीत अधिकाऱ्यांशीना कळवल्याचे सांगितले असून मुंबईवरून परत येताच आग पिडीत परीवाराची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here