In the competitive situation, the responsibility of Mahanirmithi has increased: Energy Minister Dr. Nitin Raut
In the competitive situation, the responsibility of Mahanirmithi has increased: Energy Minister Dr. Nitin Raut

स्पर्धात्मक परिस्थितीत महानिर्मितीची जबाबदारी अधिकच वाढली : ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत

महानिर्मितीच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आणि वीज केंद्रांच्या मुख्य अभियंत्यांशी ऊर्जामंत्र्यांचा संवाद.

In the competitive situation, the responsibility of Mahanirmithi has increased: Energy Minister Dr. Nitin Raut

✒️मनोज खोब्रागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर 12 मार्च :- वीज निर्मितीमध्ये महाजेनकाेने आतापर्यंत माेठा पल्ला गाठला आहे, यामुळे सर्वाधिक वीज उत्पादनाचा विक्रम महाजेनकाेच्या अभियंता व कर्मचाऱ्यांमुळे शक्य झाला आहे. परंतु यापुढील काळ हा स्पर्धेचा आहे. या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी महाजेनकाेने ग्राहकांना स्वस्त वीज व खर्च कमी करण्यावर अधिक भर दिला पाहिजे, असा सल्ला राज्याचे ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी आज दिला.

डाॅ. नितीन राऊत यांनी आज राज्यातील सर्व वीज निर्मिती केंद्रांच्या मुख्य अभियंत्यांशी व्ही.सी.द्वारे संवाद साधला व्यक्तिगत अभिनंदन केले आणि अडचणी जाणून घेतल्या. यावेळी महाजेनकाेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, संचालक (खनिकर्म) पुरुषाेत्तम जाधव, संचालक (प्रकल्प) व्ही. थंगापांडीयन,संचालक (वित्त) बाळासाहेब थिटे, कार्यकारी संचालक अभय हरणे, संजय मारुडकर, कैलाश चिरुटकर, नितीन चांदूरकर सहभागी झाले हाेते.

महाजेनकाेने गेल्या 60 वर्षात प्रथमच वीज उत्पादनाचा उच्चांक गाठला असून विक्रमी 10445 मेगावॅट वीज निर्मिती केली. ही कामगिरी केल्याबद्दल प्रारंभी डाॅ. नितीन राऊत यांनी सर्व अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी, कंत्राटी कामगारांचे विशेष अभिनंदन केले.

काेराेनाच्या काळात अत्यंत विपरीत परिस्थितीचा सामना करीत अभियंत्यांनी मनुष्यबळाने वीज योद्ध्याची भूमिका बजावल्याचे त्यांनी कौतुक केले. सोबतच डाॅ. राऊत यांनी वीज उत्पादनातील आव्हानांची सुद्धा जाणीव करून दिली. केंद्र सरकार खासगीकरणाचा आग्रह धरत असताना आपल्याला अधिकाधिक व्यावसायिक पद्धतीने कामकाज करावे लागणार आहे. यासाठी वीज निर्मिती करताना अनावश्यक खर्च टाळणे व ऑपरेशन व मेंटनन्सचा (ओ अँड एम) खर्च कमी करण्यासाठी उपाययाेजना करणे, बेस्ट प्रॅक्टिसेसचा अवलंब करणे याबाबत पाऊले उचलावी लागणार आहे. गुणवत्ता व न्यूनतम उत्पादन खर्चाचा मेळ यापुढे घालावा लागणार असल्याचे डाॅ. राऊत यांनी सांगितले.

यावेळी महाजेनकाेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे म्हणाले की ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वेळाेवेळी दिलेल्या निर्देशानुसार आम्ही निरंतर सुधारणा केल्या. त्याचा परिपाक म्हणून ही विक्रमी कामगिरी शक्य झाली आहे. आगामी आव्हानांचा यशस्वी सामना करण्यासाठी महानिर्मिती टिम सज्ज असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

प्रारंभी ऊर्जामंत्री यांनी कोराडी संच क्रमांक 8, 9 आणि 10 च्या नियंत्रण कक्षाला भेट दिली तेथील अभियंत्यांचे अभिनंदन केले तसे वीज केंद्राच्या प्रतिकृतीचे (मॉडेल) अवलोकन केले. काेराडी औष्णिक वीज केंद्राची सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती जाणून घेतली. त्यानंतर संचालक (संचालन) राजू बुरडे यांनी महानिर्मितीची ठळक वैशिष्ट्ये विषयक उपस्थितांना माहिती दिली.

राज्यातील सर्व वीज केंद्राच्या मुख्य अभियंत्यांनी सद्यस्थिती, अडचणी आणि आगामी नियोजन विषयक उर्जामंत्र्यांशी संवाद साधला. यामध्ये पंकज सपाटे (चंद्रपूर), राजू घुगे (खापरखेडा), विठ्ठल खटारे (पारस), प्रकाश खंडारे (भुसावळ), नवनाथ शिंदे (नाशिक), माेहन आव्हाड (परळी), राजेश पाटील व राजकुमार तासकर (कोराडी)पंकज नागदेवे (उरण), अजय बामने (काेयना) व अभिजीत कुलकर्णी (पुणे) आदींनी सहभाग घेतला. प्रकल्प विषयक कामांबद्दल संचालक प्रकल्प थंगपांडियन यांनी माहिती दिली. मुख्य अभियंता राजेश पाटील यांनी आभार मानले तर व्ही सी मध्ये मुख्य अभियंते अनिल आष्टीकर, राजेश कराडे, गिरीश कुमरवार प्रामुख्याने सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here