Karanja (Ghadge) two volleyball players in the national team.
Karanja (Ghadge) two volleyball players in the national team.

कारंजा (घाडगे) चे दोन व्हॉलीबॉल खेडाळू राष्ट्रीय संघात.

Karanja (Ghadge) two volleyball players in the national team.

✒️✒️आशीष अंबादे प्रतीनिधी✒
कारंजा (घा.),11 मार्च:-  नुकत्याच पन्हाळा (कोल्हापुर) येथे झालेल्या वयोगट 16 वर्षा आतील मुलींची राष्ट्रीय संघामध्ये मॉडेल स्पोर्टिंग क्लब खेडाळू रक्षा विनोद खेनवार व सोबत बीड येथे 18 वर्षीय आतील राष्ट्रीय संधामध्ये लक्ष्मी संजय घुगुस्कर हिची निवड झालेली आहे. रक्षा विनोद खेनवार हीने वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत 4 नेशनल पटकाविण्याचा गौरव प्राप्त केला आहे. मॉडेल हायस्कूल व मॉडल स्पोर्टिंग क्लब च्या बऱ्याच व्हॉलीबॉल खेडाळूनी आता पर्यंत राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर आपले उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे.

दोघींच्या यशाला मॉडल-हायस्कूलचे संदीपजी काळे, प्राचार्य हेमंतजी ढोले सर, उप-प्राचार्य महादेवजी टोपले सर, स्पोर्ट शिक्षक मनोज काळे सर व चंद्रशेखर गिऱ्हाळे सर तसेच मॉडल स्पोर्टिंग क्लब चे व्हॉलीबॉल प्रशिक्षक- पंकज अग्रवाल, न.प. कारंजा माजी क्रीड़ा व शिक्षण सभापति प्रेमसिंग महीले, माजी ग्रा. प. सदस्य कमलेश कठाणे यानी अभिनंदन केले व पुढ़िल वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here