भाजयुमोच्या चंद्रपुर महानगरातील नवनियुक्त मंडळ अध्यक्षांचा सत्कार सोहळा सम्पन्न.

59

भाजयुमोच्या चंद्रपुर महानगरातील नवनियुक्त मंडळ अध्यक्षांचा सत्कार सोहळा सम्पन्न.

सत्कार सोहळ्यामुळे पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो – सौ.राखीताई कंचर्लावार

पूर्ण शक्तिने भाजयुमोचे नवनियुक्त मंडळ अध्यक्ष पक्ष संघटन वाढीसाठी प्रयत्न करतील : डॉ.मंगेश गुलवाडे

Newly appointed Board President of BJP's Chandrapur metropolis felicitated.

✒मनोज खोब्रागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- भारतीय जनता पार्टी मध्ये संघटनात्मक रचना करने सुरु आहे. चंद्रपुर महानगरात पाच मंडळ तयार करण्यात आले आहे. युवकांचे संघटन वाढविण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पाच ही मंडळ अध्यक्षाची नियुक्ति करण्यात आली आहे. त्यामध्ये गजानन भोयर, संजय पटले, गणेश
रामगुंडेवार, हिमांशु गादेवार, अमित गौरकार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नवनियुक्त अध्यक्षांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी महापौर राखीताई कंचर्लावार यांनी बोलतांना सांगितले की नवनियुक्त अध्यक्षांचा सत्कार झाला तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो व त्यामुळे ते पक्षाच्या विचारधारेला सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी अधिक जोमाने कार्य करीत असतात. त्यानंतर भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी युवकांचे संघटन वाढीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पाच ही नवनियुक्त मंडळ अध्यक्षांनी प्रयत्न करून संघटनेचा विस्तार करण्यासाठी सदैव तत्पर असावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

या सत्कार सोहळ्याला उत्तर देतांना पाचही मंडळ अध्यक्षांनी पक्षाने दाखविलेला विश्वास पूर्णपने सार्थ करुण दाखवू अशी ग्वाही दिली. सदर कार्यक्रमात स्थायी समिति अध्यक्ष रवि आसवानी, भाजपा कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री ब्रिजभूषन पाझारे, महामंत्री रविंद्र गुरनुले, भाजयुमो अध्यक्ष विशाल निंबाळकर, नगरसेवक तथा सभागृह नेते संदीप आवारी, नगरसेवक संजय कंचर्लावार, नगरसेविका छबुताई वैरागडे, भाजयुमो महामंत्री प्रज्वलंत कडु, महामंत्री सुनील डोंगरे, महामंत्री प्रमोद शिरसागर, माध्यम संपर्क प्रमुख प्रशांत विघ्नेश्वर, राजेंद्र खांडेकर,सचिव रामकुमार अक्कापेल्लीवार, भाजपा सिव्हिल मंडळ अध्यक्ष रवी लोणकर, माजी नगरसेवक महेंद्र जुमडे, कुणाल गुंडावार, प्रवीण उरकुडे, रोहित भिसेकर, शुभम रंगदळ, मोनिष बघेल, पराग कुत्तरमारे, प्रसाद शेटे यांची प्रामुख्यने उपस्थिति होती.