पोलीस असल्याचे भासवून जालना येथे वृद्धाची 70 हजारांने केली फवणूक.

57

पोलीस असल्याचे भासवून जालना येथे वृद्धाची 70 हजारांने केली फवणूक.

Pretending to be a policeman, 70,000 old men were abducted in Jalna.

✒प्रदिप शिंदे जालना प्रतिनिधी✒
जालना, दि.11 मार्च:- जिल्हातुन एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पोलिस उपनिरीक्षक असल्याचे भासवून एका भामट्याने 72 एकाने वर्षीय एका वृद्धाला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ही घटना घडली. याप्रकरणी चंद्रकांत रंगनाथराव रामदासी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, वृद्धाची फवणूक करणाऱ्या भामट्याने चंद्रकांत रामदासी यांना बनावट ओळखपत्र दाखवून, “मी पोलिस उपनिरीक्षक आहे, सध्या तपासणी सुरू आहे, तुमच्या हातातील सोन्याच्या दोन अंगठ्या व गळ्यातील सोन्याची चेन रुमालात ठेवा,’ असे सांगितले. नंतर हातचलाखीने रुमाल घेऊन त्यांतील सोने काढून घेतले आणि रुमाल वृद्धाच्या खिशात ठेवून 70 हजार रुपायांची फसवणूक केली.
रामदासी हे मिशन रुग्णालयात गेले असता त्यांनी खिशातील रुमाल काढून तपासला तेव्हा त्यातील सोन्याच्या अंगठ्या आणि साखळी गायब होती. त्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर बाजार पोलिस ठाण्यात दोन भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.