आईने साडी ऐवजी घातला पंजाबी ड्रेस, म्हणून मुलाने केली गळाफास घेऊन आत्महत्या.

58

आईने साडी ऐवजी घातला पंजाबी ड्रेस, म्हणून मुलाने केली गळाफास घेऊन आत्महत्या.

The mother wore a Punjabi dress instead of a sari, so the boy committed suicide by strangulation.

✒सातारा जिल्हा प्रतिनिधी✒
सातारा,दि.11 मार्च:- जिल्हातील नागठाणे येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका मुलाने या साठी गळाफास घेउन आत्महत्या केली, की आईने साडी न नेसता पंजाबी ड्रेस घातला म्हणून चिडलेल्या मुलाने घराजवळील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

प्राप्त माहितीनुसार सातारा तालुक्यातील नागठाणे येथील बाजार परिसरात राहणाऱ्या एका मुलाने आत्महत्या केली. पंजाबी ड्रेस घालू नको, तर तू साडी नेस असे त्या मुलाने आईला सांगितले, पण तिने साडी न नेसता पंजाबी ड्रेस घातला. यामुळे रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

शेरू शौकत भोसले वय 16 वर्ष असे या आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागठाणे गावात बाजार परिसरात भोसले कुटुंब राहतं. शेरूची आई घरातच होती. तिने पंजाबी ड्रेस परिधान केला होता. यावेळी शेरूने तू ड्रेस का घातला, साडी नेसली का नाही, असे विचारले. पण तिने साडी नेसायला नकार देत पंजाबी ड्रेसच घातला. यावरून शेरूला राग आला. रागाच्या भरात तो घरातून निघून गेला; नंतर घरातल्या मंडळींनी त्याचा शोध घेतला. त्यावेळी घरापासून जवळच असलेल्या एका झाडाला ओढणीच्या साह्याने त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले.