15 मार्च रोजी महिला लोकशाही दिनाचे चंद्रपूर येथे आयोजन

51

15 मार्च रोजी महिला लोकशाही दिनाचे चंद्रपूर येथे आयोजन

Women's Democracy Day on March 15 at Chandrapur
on March 15 at Chandrapur

✒मनोज खोब्रागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर, दि. 12 मार्च:- सोमवार दि. 15 मार्च रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन सकाळी 11.00 ते 1.00 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे.

सदर महिला लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक आस्थापने विषयक बाब, अशी प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत. तरी ज्या महिलांचे वरील बाबी सोडुन तक्रार/ निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे असतील अशा महिलांच्या तक्रारी सोमवार दि. 15 मार्च 2021 रोजी सकाळी ठिक 11.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत स्विकारण्यात येईल. विहीत नमुना लोकशाही दिनात पुरविण्यात येईल.

सदरील महिला लोकशाही दिनामध्ये जिल्हास्तरीय तक्रार अर्ज व तालुकास्तरावरील अपीलीय अर्ज स्विकारण्यात येतील, असे महिला व बाल विकास अधिकारी रमेश टेटे यांनी कळविले आहे.