Worship of Mahashivaratri washed under the influence of alcohol, death of an old man with a neck stuck in a trident.
Worship of Mahashivaratri washed under the influence of alcohol, death of an old man with a neck stuck in a trident.

दारुच्या नशेत धूत केली महाशिवरात्रीची पूजा, त्रिशूळात मान अडकून वृद्धाचा मृत्यू.

 Worship of Mahashivaratri washed under the influence of alcohol, death of an old man with a neck stuck in a trident.

✒️प्रशांत जगताप✒️
वर्धा, दि.11 मार्च :- जिल्हातील अल्लीपुर येथे महाशिवरात्रीच्या दिवशी पुजा करतांना एका वृध इसामाचा त्रिशुळात मान अडकल्यामुळे मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दारुच्या नशेत पूजा करताना हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

काल संपुर्ण भारतात मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी केल्या जात होती पण वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील अल्लिपूर येथे भवानी वार्डात 60 वर्षीय विश्वनाथ टिकाराम टेकाम यांचा पुजा करत असतांना त्रिशुळात मान अडकल्यामुळे दुर्दवी मृत्यू झाला.

विश्वनाथ टिकाराम टेकाम आणि पत्नी दोघे राहत होते. महाशिवरात्रीच्या दुपारी पत्नी घराच्या बाहेर गेली होती. यावेळी विश्वनाथ टेकाम हे घरात शंकराची उपासना करत होते. महाशिवरात्रीला महादेवाच्या त्रिशूलाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. बऱ्याच भागात मनोकामना पूर्ण झाल्यावर शिव मंदिरात त्रिशूल भेट देण्याचीही प्रथा आहे.

विश्वनाथ टेकाम यांनी दारूचे सेवन केलं होते. त्यांच्या घरातच पूजा करण्यासाठी त्रिशूळ गाडलेला आहे. दुपारी कुणीही नसताना दारुच्या नशेत धुंद होऊन त्यांनी घरीच महाशिवरात्रीची पूजा केली. त्यानंतर त्रिशूळाच्या बाणात आपल्या मानेचा भाग घालून घेतला. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी ही घटना घडली, परंतु संध्याकाळी उजेडात आली.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अल्लिपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनेची चौकशी करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. अचानक झालेल्या या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली असून नेमका मृत्यू कसा झाला, हा प्रश्न उपस्थित होत आहे. पुढील तपास अल्लिपूर पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here