पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालयात 10 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला

पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालयात 10 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला

पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालयात 10 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो .9860884602

पाचोरा : प्रतिनिधी : -दि १२/०३/२०२२ रोजी सातगाव (डों)ता. पाचोरा येथील पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालय येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. निरोप समारंभाचे औचित्य साधून गजानन लाधे (पाटील) यांनी महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा परीक्षा लेखक चालू घडामोडी पुस्तकाचे लेखक बळीराम हावळे यांच्या पुस्तकाचे गजानन लाधे (पाटील) यांनी स्वखर्चाने पुस्तके आणून ८वी ते १० पर्यंत च्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी जनरल नॉलेज चा अभ्यास करावा व स्पर्धा परीक्षा मध्ये भाग घ्यावा असे मत देशदूत पत्रकार RDR न्यूज चे गजानन भाऊ यांनी व्यक्त केले.व प्रत्येक विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले. व शाळेतील भावना सांगितल्या व विद्यार्थ्यांनाचा निरोप समारंभ कार्यक्रम चालू असतात शिक्षक वर्ग भाविक झालेले होते. पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मनगटे सर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. आकाश मालपुरे सर यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला मनोगत व्यक्त करण्यास प्रोत्साहन दिले. आदर्श आश्रम शाळेचे मुख्याध्यापक राहुल पवार सर यांनीसुद्धा त्यांचे मनोगत व्यक्त केले तसेच लोहार सर,फिरोज खाटीक सर, डी.आर.पाटील सर, संदेश पवार सर, सुनील बच्चे सर, व शिक्षक शिक्षकेतर, कर्मचारी, कार्यक्रमास उपस्थिती होते.