जागृती महिला मंडळ गडचिरोली द्वारा कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम.
✍ *आयुष दूधे* ✍
*मो : 8468984617
8605627068*
*येनापुर ग्रामीण प्रतिनिधि*
येणापूर : -जागृती महिला मंडळ गडचिरोली द्वारा आयोजित महिला व मुलांकरिता सहाय्यक कक्ष पोलीस स्टेशन गडचिरोली च्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम दिनांक 11/03/2022 रोज शुक्रवारला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरमाडी येथे घेण्यात आला कार्यक्रमाचे उदघाटक श्री.मा. भोगेश्वर कोडाप सरपंच ग्रा.पं. मुरमाडी, कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापिका प्रज्ञा वनमाली मैडम फुले आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गड. प्राध्यापिका कविता उईके मैडम फुले आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गड. सौ.विजयाताई गद्देवार सचिव महिला जागृती मंडळ गड. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री.मा.गिरिधर बोरकर पोलीस पाटील मुरमाडी,यशवंत डोईजड उपसरपंच ग्रा.पं. मुरमाडी, कु. नेहा मानवटकर समुदाय आरोग्य अधिकारी मुरमाडी, कवडुजी भुसारी तंटामुक्त अध्यक्ष मुरमाडी, लताबाई नैताम ग्रा.पं.सदस्य मुरमाडी, निजाबाई कुमरे ग्रा.पं. सदस्य मुरमाडी वंदना नैताम ग्रा.पं.सदस्य मुरमाडी,लिलाबाई बोरकर सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका मुरमाडी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री.मा.अमोल किरमिजवार समुपदेशक महिला व मुलांकरिता सहाय्यक कक्ष गडचिरोली यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार कनिका सरकार हिने मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फुले आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली येथील महाविद्यालयाचे विद्यार्थी सुरज कुमरे,वैभवी देव्हारे, काजल वाटे, आकाश बडांवार, मोनाली बोरकर यांनी सहकार्य केले.