हिंगणघाट तालुका पक्षी जागतिक चिमणी दिवसानिमित्त जिओ टॅग फोटो स्पर्धा :
निसर्ग साथी फाउंडेशन हिंगणघाट चे आयोजन
✒करण विटाळे✒
हिंगणघाट तालुका ग्रामीण
प्रतिनिधी : 8806839078
हिंगणघाट: शहरासह तालुक्यात पशु ,पक्षी,पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत निसर्गसाथी फाउंडेशन निसर्ग घटकां बद्द्ल जनजागृती करीत आहे.मागील वर्षी तालुका पक्षी,सर्प निवडणूक आयोजीत करण्यात आली यात तालुका पक्षी म्हणुन ” चिमणी ” निर्वाचीत घोषीत करण्यात आली.एरवी चिमणीच्या आवाजाने होणारी दिवसांची सुरुवात दिसेनाशी झाली आहे.या चिमणी चे संवर्धन जनजागृती व चिमण्यांची संख्या कशी वाढवता येईल याकरिता यंदा दि २० मार्च २२ ला जागतिक चिमणी दिवस (तालुका पक्षी) निमित्ताने हिंगणघाट शहरासह तालुक्यातील शाळा , महाविद्यालयीन विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक,गृहिणी यांचे करीता ” चिमणी जिओ टॅग छायाचित्र स्पर्धा ” आयोजित करण्यात आली आहे .
(चिमणी जिओ टॅग छायाचित्र स्पर्धा
नियमावली)
स्पर्धा सर्वांसाठी खुली व विनामूल्य आहे.स्पर्धेत सहभागी होण्याकरिता जिओ टॅग ॲप डाऊनलोड करुन फोटो घ्या.
जिओ टॅग ॲप वरुन घेतलेले फोटोच स्पर्धेकरीता ग्राह्य धरण्यात येईल.
हिंगणघाट तालुक्यात १४/३/२२ ते २०/३/२२ सायंकाळी ५ दरम्यान घेतलेला चिमणी चा फोटो पुढे दिलेल्या लिंक वर दिनांक २० तारखेला सायं ६ पर्यंत अपलोड करणे बंधनकारक राहील.हिंगणघाट तालुक्याच्या बाहेरचा तसेच दिलेल्या मुदती नंतर चा फोटो अपात्र ठरविण्यात येईल .
https://forms.gle/K8dSyN9XBysKT6x69 या लिंकवरुन गुगल फार्म पुर्ण भरावा आणि योग्य ठिकाणी ‘ चिमणीचा घेतलेला फोटो अपलोड करावा.
गुगल फार्म पुर्ण भरणे आवश्यक आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन निसर्ग साथी फाउंडेशन चे अध्यक्ष प्रविण कडु,प्रा डॉ बालाजी राजुरकर, राकेश झाडे,प्रभाकर कोळसे, गुणवंत ठाकरे,नियाजुद्दीन शिद्धीकी,प्रा सुलभा कडू, राजश्री विरुळकर, चैतन्य वावधने, यशवंत गावात, करण विटाळे आदींनी केले आहे.