रामनगर पोलिसांनी धाड टाकून पकडला गांजा वनस्पती वजन सुमारे २.०७२ किलो. ग्रॅम असा एकुण १०,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त एक आरोपी अटकेत
✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर -9860020016
चंद्रपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की दिनांक ०९/०३/२०२२ रोजी फिर्यादी सरतर्फे संदिप ख. धोबे सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन रामनगर यान मुखबिरव्दारे खबर मिळाली की, इसम नामे कन्हैया नारायन कुंडू वय ४२ वर्ष चंदा चिकन सेंटर रा. प्रगती नगर बल्हारशा बायपास रोड चंद्रपुर आपले राहते घरी अवैधरित्या गांजा बाळगुन विक्री करीत आहे अशा खबरेवरून पंच, डि.बी. पथक, फोटोग्राफर यांचेसह नमुद इमसावे राहते घरी गांजा रेड केली असता त्याचे राहते घरी पहिल्या खोली मध्ये खाटे खाली एका हिरव्या रंगाच्या प्लॉस्टीक पिशवी ज्यावर PRANALI-७७ असे लिहलेले असून त्या प्लास्टिकच्या पिशवीत गांजा वनस्पती वजन सुमारे २.०७२ किलो. ग्रॅम असा एकुण १०,०००/- रूपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने नमुद इसमा विरुद्ध पोलीस स्टेशन, रामनगर येथे २०९ / २०२२ कलम २०(बी), (बी) २२ एनडीपीएस अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस निरीक्षक सा, पोस्टे रामनगर यांचे मार्गदर्शनात सपोनि संदिप धोबे, सपोनि हर्षल ओकरे, पोउपनि विनोद भुरले तसेच डी. बी. पथक रामनगर यानी केली.
आरोपी नाव: कन्हैया नारायन कुंडू वय ४२ वर्ष धंदा चिकन सेंटर रा. प्रगती नगर बल्हारशा बायपास रोड चंद्रपुर
जप्त माल : एका हिरव्या रंगाच्या प्लॉस्टीक पिशवी ज्यावर PRANALI- ७७ असे लिहलेले असुन त्या प्लास्टिकच्या पिशवीत गांजा वनस्पती वजन सुमारे २०७२ किलो ग्रॅम असा एकूण १०,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अरविंद साळवे सा. चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. अतुलचंद्र कुलकर्णी सा., मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. सुधीर नंदनवार सा. यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याचे पोनि राजेश मुळे, सा., सपोनि हर्षल ओकरे, पोउपनि विनोद भुरले. पो.हवा. रजनीकांत पुठ्ठावार, पोहवा/ पेतरस सिडाम, चिकाटे, नापोशि/११७६ किशारे वैरागडे, नापोखि/२२२९ विनोद यादव, नापोशि/११६५ आनंद खरात, नापोशि/२५८० पांडुरंग वाघमोडे, नापोशि/९१७ निलेश मुडे, नापोशि. / ५३२ सतिष अवयरे, नापो.शी./२४३० लालु यादव, पोशि/ २५१३ विकास गुमनाके, पोशि/८८१ संदिप कामडी, पोशि/८२५ हिरालाल गुप्ता, मनापोशि/ भावना रामटेके, मोशि/ बुल्टी साखरे यांनी केली आहे.