सयाजीराव गायकवाड जयंती साजरी

सयाजीराव गायकवाड जयंती साजरी

सयाजीराव गायकवाड जयंती साजरी

✍मुकेश मेश्राम✍
जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण भंडारा
📱7620512046📱

भंडारा:- लक्ष्मी शिक्षण संस्था केसलवाडा/वाघ द्वारा संचालित स्व. निर्धनराव पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तुप येथे सयाजीराव गायकवाड यांची जयंती ११ मार्च २०२२ ला प्राचार्य प्रा. बी.बी. ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथालय विभागाच्या विद्यमाने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा.विशाल गजभिये यांनी केले. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा संस्थान येथे राबविलेल्या शैक्षणिक योजना, गाव तिथे ग्रंथालय उपक्रम, शेती विषयक कामे, शहर सुधार योजना, पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय, प्रजेविषयी आदर, स्त्री शिक्षण सोय, इत्यादी विषयी सविस्तर माहिती दिली.
प्राचार्य प्रा.बी.बी.ढवळे यांनी सयाजीराव गायकवाड यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याविषयी उजाळा दिला.
भुगोल विभाग प्रमुख तसेच राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा.विश्वास खोब्रागडे यांनी सयाजीराव गायकवाड यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार ग्रंथालय परिचर गितेश्वरी तरोणे यांनी केले.
कार्यक्रमप्रसंगी प्रा.डॉ. अर्चना निखाडे, प्रा.डॉ.श्रीकांत भुसारी, प्रा.डॉ.राहुल चुटे, प्रा.महिंद्र.एच.फुलझेले, प्रा.स्नेहा शामकुवर, प्रा.डॉ.भुमेश्वरी वाघाये तसेच महाविद्यालयीन लिपीक खेमराज वाघाये,श्रीकांत धुर्वे,अजय मेश्राम,ग्रंथालय परिचर गितेश्वरी तरोणे, महाविद्यालयीन शिपाई किशोरी ननोरे, अमर जांभूळकर, तेजेंद्र सदावर्ती,देवेंद्र मेंढे व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here