पत्नी ने केली प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या! 48 तासात बल्लारपूर पोलीसांनी केले हत्तेचे गुढ उघड

पत्नी ने केली प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या!

48 तासात बल्लारपूर पोलीसांनी केले हत्तेचे गुढ उघड

पत्नी ने केली प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या! 48 तासात बल्लारपूर पोलीसांनी केले हत्तेचे गुढ उघड

✍सौ हनिशा दुधे✍
बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
97642 68694

बल्लारपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की,10 मार्च रोजी रात्री दहा वाजता राजुरायेथुन बल्लारपूर कडे येताना एक व्यक्ती दुचाकीसह नदीत पडल्याचे व एक व्यक्ती पुलावर पडल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते, पण बल्लारपूर पोलिसांनी 48 तासातच हा अपघात नसून हत्या असल्याचे तपासाअंती उघड केले असुन अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचे पोलिसांनी म्हंटले आहे.
प्राप्त माहितीनुसार मृतक रामेश्वर उर्फ लाल्या कलीचरण निषाद (30) आणि आरोपी सुरज हुबलस सोनकर शेजारी राहत होते मृतक रामेश्वरच्या पत्नी सोबत आरोपी सुरज चे अनैतिक प्रेम संबंध जुळले दोघांचा प्रेमात पती अडसर ठरला होता त्याचा काटा काढाचा कट मागील दोन महिन्या अगोदर ही कट रचला होता पण यशस्वी झाले नाही.
दिनांक 10 मार्च रोजी आरोपी सुरज आणि सोबत घेतलेला दुसरा आरोपी अभिजित दिनेश पांडे रा, करणवाडी-मारेगाव, जिल्हा यवतमाळ यालासोबत घेऊन तिघेही राजुरा इथे राजु  धाब्यावर जेवणाची पार्टी करिता मृतक रामेश्वर ला घेऊन गेले. तिथे जाण्यापूर्वी तिघांनीही मद्यप्राशन केले. धाब्यावर जेवण करून परत येताना आरोपींनी वर्धा नदीच्या पुला खालून चोरीचे डिझेल घ्यायचं आहे असे सांगून नदी काठी गेले पण कोणीच तिथे हजर नसल्याने अंघोळीच्या बहाणा करून पाण्यात दोघे आरोपी उतरले व मृतकाला पण पाण्यात बोलाविले, संधी साधून दोन्ही आरोपीने मृतक रामेश्वर ला पाण्यात बुडवून मारून टाकले आणि वाहत्या पाण्यात सोडले.आणि वर्धा नदीचा पुलावर येऊन दुचाकी क्र, मग34-आई-8437ला नदी मध्ये टाकले.
असा केला बनाव अपघात
आरोपी सूरज सोनकर ने दुचाकी नदीत टाकली आणि आरडा ओरडा करीत येण्या जाणाऱ्या ना बोलाविले आणि 112 वर फोन करून पोलिसांना माहिती दिली की आम्ही दोघेही रामू चा धाब्यावर जेवण करून येत असताना आमची दुचाकी समोरून येत असलेल्या ट्रक चा प्रकाशाने दुचाकी नदीत पडली आणि मी उडी मारली व बचावलो असे सांगीतले.
पोलिसांना आला संशय
बल्लारपूर पोलिसांनी बारकाईने निरीक्षण केले असता त्यांना संशय आला की रामू चा ढाबा आणि राजुरा पूल5 ते 10 मिनिटे चा अंतरावर आहे आणि आरोपी एक घंटा नंतर फोन केला?रामुचा धब्यावरचे cctv फुटेज तपासले असता त्यांना तिघे येताना व जाताना दिसले, पोलिसांनी सुरज ला ताब्यात घेऊन कसून चोकशी केली असता व दुसरा आरोपी ला पण ताब्यात घेतले असता सर्व प्रकरण समोर आले.पोलिसांनी मृतकचा पत्नी सह दोन्ही आरोपीना कलम 302,120(ब)201पुरावा नष्ट करणे अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here