मोहाडी येथील एन.जे.पटेल महाविद्यालयात एन.एस.एस.द्वारे जागतिक महिला दिन सोहळा साजरा 

मोहाडी येथील एन.जे.पटेल महाविद्यालयात एन.एस.एस.द्वारे जागतिक महिला दिन सोहळा साजरा 

मोहाडी येथील एन.जे.पटेल महाविद्यालयात एन.एस.एस.द्वारे जागतिक महिला दिन सोहळा साजरा 

✍ भवन लिल्हारे ✍
* उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा *
📱८३०८७२६८५५ 📱
📞 ८७९९८४०८३८ 📞

मोहाडी :- भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात दिनांक ८ मार्च २०२२ रोजी स्थानिक एन. जे. पटेल महाविद्यालयात एन.एस. एस. विभाग द्वारे ” जागतिक महिला दिवस ” सोहळा साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित पोलीस स्टेशन मोहाडी येथील निरीक्षक मा.श्री. देशपांडे साहेब यांनी ” सायबर क्राईम व महिला सुरक्षा ” या विषयावर मार्गदर्शन केले, सोशल मीडिया किंवा इंटरनेट द्वारा महिला व युवतींना कसं जाळ्यात ओढले जाते, कसे शोषण केले जाते, मुली स्वतः आणि त्यांचे परिवार कसे उध्वस्त होतात हे प्रत्यक्ष विविध केसेस क्या अनुभवातून सांगितले. तसेच अशा अडकलेल्या जाळ्यापासुन कसा बचाव करावा,कशी आणि कुणाची मदत घ्यावी लागते, हे सुध्दा समजावून सांगितले.
एन.जे. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,
अध्यक्षीय स्थानावरून डॉ. पांडे मॅडम यांनी मुलींना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. पोलीस हेड कॉन्स्टेबल मा.श्री. पटले जी या प्रसंगी उपस्थित होते, कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रम अधिकारी प्रा. भैसारे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून या दिवसा मागची पार्श्वभूमी सांगून भारतीय समाज सुधारकांच्या महिला उत्थानातील योगदानामुळे ती कशी सबल होत आहे हे सुध्दा स्पष्ट केले. तसेच ग्रामीण महिलांना जागरूक करुन सध्याच्या नव तंत्रज्ञाना मुळे होणारी तिची फसगत थांबविण्यासाठी तिला गरज मार्गदर्शनाची आहे असे सांगितले. या वेळी पायल झेलकर व राधिका डेकाटे या विद्यार्थिनींनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल कुलरकर तर आभाप्रदर्शन दामिनी राखडे यांनी केले. कार्यक्रमात डॉ. पवार सर, डॉ. राऊत मॅडम, डॉ. डाकरे मॅडम, डॉ. वानखेडे सर, मा.श्री. चकोले सर, व बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here