औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या साप्ताहिक आपले ज्ञानपंख व एन फिल्म प्रोडक्शन आयोजित महाराष्ट्र सिने कला गौरव पुरस्काराचे वितरण सोहळा संपन्न

औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या साप्ताहिक आपले ज्ञानपंख व एन फिल्म प्रोडक्शन आयोजित महाराष्ट्र सिने कला गौरव पुरस्काराचे वितरण सोहळा संपन्न

औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या साप्ताहिक आपले ज्ञानपंख व एन फिल्म प्रोडक्शन आयोजित महाराष्ट्र सिने कला गौरव पुरस्काराचे वितरण सोहळा संपन्न

दिग्गज कलावंतांच्या उपस्थित महाराष्ट्रातील सिने कलाकार, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते चित्रकार कवी,साहित्यिक, यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

मोठ्या उत्साहात सिने कला गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या साप्ताहिक आपले ज्ञानपंख व एन फिल्म प्रोडक्शन आयोजित महाराष्ट्र सिने कला गौरव पुरस्काराचे वितरण सोहळा संपन्न

✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर -8208166961

औरंगाबाद : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,”साप्ताहिक आपले ज्ञानपंख व एन फिल्म प्रॉडक्शन”च्या वतीने ‘महाराष्ट्र सिने कला गौरव पुरस्कारांचे औरंगाबाद शहरातील डॉ मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्राच्या भव्यदिव्य सभागृहात आयोजित केला होता. नुकतेच या महाराष्ट्र सिने कला गौरव या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सर्व पुरस्कार प्राप्त सिने कलावंत,पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते,अधिकारी, चित्रकार, या हस्तींचा यथोचित सन्मान करण्यात आला.
त्यावेळी त्या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटक म्हणून प्रसिद्ध सिनेअभिनेत्री तथा महाराष्ट्र बहुजन चित्रपट आघाडीच्या महिला प्रदेशाध्यक्ष ,सुलक्षणा पाटील,सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून झेपचे मुख्य संपादक तथा समीक्षक डी.एन जाधव, तर प्रमुख पाहुणे म्हणून दूरचित्रवाहिनी सिरियल (बाळूमामा नायक )प्रसिद्ध अभिनेते राजेश कांबळे, प्रसिद्ध अभिनेते गणेश मोरे,प्रसिद्ध सिने अभिनेते सचिन जगताप, प्रसिद्ध सिने अभिनेते सुहास वैद्य, प्रसिद्ध सिने अभिनेत्री किरण बनकर, अश्विनी सोनार,पत्रकार दिपक वाघ हे उपस्थित होते.

महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत विशेष कर्तबगारी बजावणारे कलावंत, पत्रकार, साहित्यिक, लेखक आणि सांस्कृतिक व्यक्तीरेखांचा, साप्ताहिक आपले ज्ञानपंख व एन.फिल्म प्रॉडक्शनने गौरव केला आहे या पुरस्कार सोहळ्यात विशेष राज्यस्तरीय महाराष्ट्र सिने कला जीवन गौरव पुरस्काराने प्रसिद्ध नाट्यकर्मी,तथा जेष्ठ अभिनेते सुरेशभाऊ डोळस यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल पुष्पहार देऊन गौरवण्यात आले. तर यावर्षीचा राज्यस्तरीय डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ते काही तांत्रीक कारणास्तव येऊ शकले नसले तरी त्यांचा पुरस्कार विद्रोही पत्रकार दिपक वाघ यांनी स्विकारला.
या पुरस्कार सोहळ्याचे प्रास्ताविक या पुरस्कार सोहळ्याचे आयोजक दशरथ सुरडकर, यांनी करुन त्यांनी प्रास्ताविक करत असताना सांगितले की,या सोहळ्याची गेल्या तीन महिन्यापासून तयारी चालु होती.पुरस्कार कुणाकुणाला द्यायचा या बाबतीत एन.फिल्म प्रोडक्शनचे निर्माता/ दिग्दर्शक पटकथाकार दिपक म्हस्के यांनी उभ्या महाराष्ट्रातील उपेक्षित मराठी चित्रपट सृष्टीतील सिने अभिनेते,सिने तारका,यांना त्यांच्या गुणवत्तेवर राज्यस्तरीय उत्कृष्ठ सिने कलाकार,नाट्यकर्मी उत्कृष्ठ पत्रकार, उत्कृष्ठ सामाजिक कार्यकर्ते,उत्कृष्ठ प्रशासकीय अधिकारी, उत्कृष्ठ चित्रकार,अशा ४१ पुरस्कारासाठी वेगवेगळे नामांकने मागितली होती त्यासाठी ५०० नामांकने आली होती.त्या नामांकनाची छाननी करुन त्या पैकी ४१ नामांकनांना वेग वेगळ्या स्तरातील पुरस्कार जाहीर केले होते. महाराष्ट्रातील दिग्गज असे सुप्रसिद्ध सिने कलाकार, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते,यांनी खरोखरच मोठ्या प्रमाणात उपस्थितीत दर्शवली त्यांचे मनापासून आभार मानतो असे त्यांनी आपल्या प्रस्ताविकात कार्यक्रमाची रुपरेषा मांडली.पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष झेपचे अध्यक्ष डी एन जाधव, यांनीही ‘आपले विचार मांडून पुरस्कार सोहळ्याची प्रशंशा केली.व म्हणाले की,दशरथ सुरडकर, व दिपक म्हस्के या दोन मित्रांनी जो हा ऐतिहासिक पुरस्कार सोहळा या औरंगाबाद नगरीत घडून आणला व वेगवेगळ्या स्तरातील व्यक्तींना विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उपेक्षित गुणवंताचा सन्मान केला त्यांचे कौतूक करावे तेवढे कमी आहे.असे अध्यक्षीय भाषणात त्यांनी शुभेच्छा दिल्या.
उद्घाटक अभिनेत्री सुलक्षणा पाटील यांनी आपल्या उदघाटनपर भाषणात आपले विचार मांडून या आगळ्या वेगळ्या पुरस्कार सोहळ्याची प्रशंशा करुन आम्हा कलावंताच्या पाठीवर अशीच कर्तृत्वाची थाप देत जावी आम्ही कलावंत जिवाची पर्वा न करता तुमचे मनोरंजन करतो अनेक वाईट प्रसंग सुध्दा आमच्यावर येतात तरी सुध्दा आम्ही कलावंत तुमचे मनोरंजन करत असतो मला या एवढ्या मोठ्या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटक म्हणून जो बहुमान मला दिला त्या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य आयोजक साप्ताहिक आपले ज्ञानपंख वृत्तपत्राचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर,व एन.फिल्म प्रोडक्शनचे निर्माता/ दिग्दर्शक/ पटकथाकार दिपक म्हस्के या़ंचे मनापासून आभार मानते अशा शब्दात त्यांनी उद्घाटन प्रसंगी सोहळ्याचे अभिनंदन केले.या पुरस्कार सोहळ्यातील पुरस्कार विजेते दूरचित्रवाणीवरील (बाळूमामा मालिकेचे नायक) प्रसिद्ध अभिनेते राजेश कांबळे (मुंबई) हे तर आपले विचार मांडत असतांना भावूक झाले होते.ते म्हणाले की, हा माझ्या जिवनातील सुवर्ण अक्षरांनी लिहिणारा क्षण आहे. मला असे स्टेजवर बोलता येत नाही मात्र सिनेमात अभिनय चांगला करु शकतो हा आजचा सोहळा ज्यांनी आयोजित केला ते साप्ताहिक ‘आपले ज्ञानपंख’ वृत्तपत्राचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर,व एन.फिल्म प्रोडक्शनचे निर्माता/ दिग्दर्शक/ पटकथालेखक दिपक म्हस्के यांनी जो मला बहुमान मिळवून दिला त्यांचे मनापासून आभार मानले.त्यांना सन्मान चिन्ह,सन्मान पत्र,शाल पुष्पहार देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय उत्कृष्ठ सिने अभिनेता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रसिध्द नाट्यकर्मी तथा जेष्ठ सिने अभिनेते
सुरेश डोळस (भोसरी),
यांनी आपल्या पहाड़ी आवाजात छत्रपती शिवरायांच्या जिवनावर बहारदार पोवाडा सादर करुन संपुर्ण सभागृहातील उपस्थितीतांच्या झोप उडवली.ते म्हणाले की, माझ्या आयुष्याला नव्हे तर माझ्या कलेला आज ख-या अर्थाने उजाळा मिळाला.त्यांनी आयोजकांचे आभार मानले.

प्रसिद्ध अभिनेते तथा पत्रकार सुहास वैद्य,यांनी आपले विचार मांडून अशा वेगवेगळ्या स्तरातील व्यक्तींचा वेगवेगळ्या प्रकारचा पुरस्कार देऊन सन्मान होतो हे मी पहिल्या वेळेसच बघत आहे.आयोजकांनी कशा प्रकारे हे उत्तम असे नियोजन करुन आमचा सन्मान करण्यासाठी माझ्यासारख्या कलावंताला बोलवले खरच दशरथ सुरडकर, दिपक म्हस्के यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे अगदी सुक्ष्म असे या पुरस्काराचे नियोजन केले त्यांचे मनापासून आभार मानतो अशा शब्दात त्यांनी सुध्दा पुरस्कार सोहळ्याचे कौतूक केले.त्यांना राज्यस्तरीय “उत्कृष्ठ सिने अभिनेते तथा उत्कृष्ठ पत्रकार” ह्या पुरस्काराने सन्मानपत्र,गौरव सन्मान चिन्ह,शाल पुष्पहार देऊन गौरवण्यात आले.

तसेच प्रसिध्द सिने अभिनेत्री नेहा पटेल (सातारा) यांनी राज्यस्तरीय उत्कृष्ठ सिने अभिनेत्री हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आयोजक दशरथ सुरडकर, आयोजक दिपक म्हस्के यांचे मनापासून आभार मानून आपल्या खास शैलीत तिने आयोजकांचे शेर शाहीरीतून कौतूक केले.त्यांना उत्कृष्ठ सिने अभिनेत्री हा राज्यस्तरीय पुरस्कार सन्मानपत्र,गौरव सन्मान चिन्ह,शाल,हार पुष्प देऊन मान्यवंराच्या व आयोजकांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

धुळ्याचे विद्रोही पत्रकार दिपक वाघ यांनी खास आपल्या शैलीत आपले विचार मांडून आयोजकांचे तोंडभरुन कौतूक केले.मला आज ज्यांच्यामुळे हा जो योग औरंगाबाद या ऐतिहासिक नगरीत येण्याचा योग्य आला ते माझे स्नेही दशरथ सुरडकर, व दिपक म्हस्के,यांचे आभार मानले त्यांनाही उत्कृष्ठ पत्रकार या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानपत्र, गौरव सन्मान चिन्ह,शाल पुष्प देऊन गौरवण्यात आले. विद्रोही पत्रकार प्रविण तायडे( सोयगांव)
यांनी तर आपल्या प्रखर शब्दात विचार मांडून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेऊन दशरथ सुरडकर, व दिपक म्हस्के, यांचे आभार मानले. त्यांनाही राज्यस्तरीय उत्कृष्ठ पत्रकार हा पुरस्कार सन्मान चिन्ह,गौरव सन्मान चिन्ह शाल पुष्प देऊन गौरवण्यात आले.
या सोहळ्यात प्रसिद्ध नाट्यकर्मी,तथा अभिनेते सचिन महाजन
प्रसिध्द अभिनेते गणेश मोरे,
प्रसिद्ध अभिनेते सचिन जगताप, प्रसिद्ध
अभिनेते सागर साठे (संगमनेर),पत्रकार जयश्री सोनवणे (पुणे), चित्रकार तथागत दशरथ सुरडकर,(सिल्लोड) अभिनेत्री शरवरी शेख (सातारा), सुरेद्र काकडे (औरंगाबाद), उत्कृष्ठ मेकप आर्टीस्ट कोमल म्हस्के (औरंगाबाद) विद्रोही पत्रकार विजय खरात, (जाफ्राबाद),विद्रोही पत्रकार गोकुळसिंग राजपूत, (सावळदबारा) शशिकला गुंजाळ (उस्मानाबाद), प्रसिद्ध अभिनेते निलेश चोपडे (मुंबई), प्रसिद्ध अभिनेते सोमनाथ जगताप (इंदापूर), प्रसिद्ध अभिनेते चंद्रकांत लोंढे (बारामती), सामाजिक कार्यकर्ते सुरेशभाऊ चव्हाण ( सोयगांव )
विद्युत महावितरण विभाग सोयगांवचे उपविभागीय अभियंता निरज बिदे, पोलीस निरीक्षक सुदाम सिरसाठ,सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल मोरे, तालुका आरोग्य अधिकारी श्रीनिवास‌ सोनवणे,तहसिलदार विक्रमसिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक नालंदा लांडगे,
जगन्नाथ काकडे, लक्ष्मण कांबळे, अमोल यादव (सातारा), रंजित सोनवणे, संघमित्रा
घेवंदे (औरंगाबाद), सौ. ठाकुर,ग्रामविकास अधिकारी रंगनाथ बोडखे (सिल्लोड) आदी कलाकार, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते वरिष्ठ अधिकारी चित्रकार, यांना उत्कृष्ठ राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
याप्रसंगी,प्रमुख आतिथी म्हणून ‘एक्सप्रेस न्यूज’ वृत्तवाहिनीचे संपादक आकाश ठाकुर,यांनीही आपले आपले मौलीक मार्गदर्शन केले.यावेळीं त्या विचारमंचावर महाराष्ट्र बहुजन चित्रपट आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर भालेराव, प्रदेश सचिव गौतम शिंदे, ‘पालवी फिल्म’च्या अभिनेत्री किरण बनकर, अभिनेत्री अश्विनी सोनार, आंबेडकरी चळवळीतील गायक बाबुराव जुंबडे धाडकर, आदींची उपस्थिती होती.
या सोहळ्याचे सुत्रसंचलन पंकज शिंदे यांनी केले. तर आभार दशरथ.एन.सुरडकर यांनी मानले.