समाजाच्या प्रगतीची केंद्र बनलेल्या आदर्श बुद्धविहारांचा " शोध आदर्श बुद्धविहारांचा" मार्फत होणार गौरव

मीडिया वार्ता
१२ मार्च, मुंबई: आजची बुद्धविहारे बौद्ध धम्माच्या जोपासनेबरोबरच समाजाच्या प्रगतीची केंद्रे बनली आहेत. धार्मिक उपक्रमांबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम राबवून समाजात एक आदर्श बनली आहेत. अशाच आदर्श बुद्धविहारांना शोधून त्यांचा गौरव करण्याचा प्रयत्न म्हणजेच शोध “आदर्श बुद्धविहारांचा” हा उपक्रम.

ह्या उपक्रमाद्वारे मुंबईस्थित असलेल्या आमच्या मीडियावार्ता ह्या पोर्टलतर्फे आम्ही तमाम नागरिकांना आवाहन करतो कि, तुम्ही, तुमच्या गावच्या, विभागाच्या बुद्धविहारातून वर्षभरामध्यें अनेक सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम राबवत असाल आणि त्याद्वारे तुम्ही तुमच्या बुद्धविहाराला समाजाच्या प्रगतीचे एक केंद्र बनवले असेल, तर आमची आपणास विनंती आहे कि, मीडियावार्ताच्या या उपक्रमात सहभागी व्हा. आम्ही आपल्या बुद्धविहाराची माहिती मीडियावार्ताच्या साप्ताहिकातून, डिजिटल पोर्टलमधून, सोशल मीडिया अकाऊंटवरून, तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांच्या जयंती विशेषांकातून जगासमोर प्रसारित करू.

 

 

या उपक्रमात कसे सहभागी व्हाल?
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मीडिया वार्ता तर्फे दिलेल्या 919920853847 ह्या क्रमांकावर व्हॉटसअँप मेसेज करावा. मेसेज करताना जय भीम, नमो बुध्दाय___तुमच्या विहाराचे नाव____गाव/विभागाचे नाव ___तुमचे स्वतःचे नाव लिहून वरील नंबरवर पाठवून द्यावे. त्यानंतर मीडियावार्ता तर्फे जाहीर करण्यात आलेल्या गूगल फॉर्मवर योग्य ती माहिती भरून फॉर्म सबमिट करावा. फॉर्मची लिंक खालीलप्रमाणे: Google Form: https://forms.gle/8o7vHgfTRPniVxzZA 

 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांच्या जयंती विशेषांकातून होणार प्रसारित
मीडियावार्ता तर्फे येत्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांच्या जयंतीनिम्मित प्रकाशित होणाऱ्या विशेषांकातून सहभागी झालेल्यामंधून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या  बुद्धविहारांची  माहिती प्रकाशित करण्यात येईल. या तीन बुद्धविहारांना “नॉलेज सेंटर” ची खास पारितोषिके देण्यात येतील. 

मीडियावार्ता सर्व नागरिकांना,संस्थांना, मंडळांना ह्या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करत आहे. जेणेकरून आपल्या बुद्धविहराच्या व्यवस्थापनातून, त्याद्वारे आपण करत असलेल्या कार्यापासून इतर लोक प्रेरणा घेतली आणि या आपल्या प्रयत्नातून शांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार होईल, आणि प्रगतिशील समाज घडविण्याकडे आपल्या साऱ्यांची वाटचाल अधिक सुलभ होईल.
धन्यवाद.

शोध आदर्श बुद्धविहारांचा या उपक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या मित्र परिवारांना शेअर करा:  https://fb.watch/c8lP0TS0tb/

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here