लोकप्रतीनिधीना शासकिय वसाहत उभारण्याकडे दुर्लक्ष.२५वर्षानंतर ही विकास उपेक्षीत. कर्मचारी मुख्यालय सोडून रहातात दुसरीकडे.

लोकप्रतीनिधीना शासकिय वसाहत उभारण्याकडे दुर्लक्ष.२५वर्षानंतर ही विकास उपेक्षीत.
कर्मचारी मुख्यालय सोडून रहातात दुसरीकडे.

लोकप्रतीनिधीना शासकिय वसाहत उभारण्याकडे दुर्लक्ष.२५वर्षानंतर ही विकास उपेक्षीत. कर्मचारी मुख्यालय सोडून रहातात दुसरीकडे.

किशोर पितळे:तळा तालुका प्रतिनिधी ९०२८५५८५२९

तळा :- तळा तालुकानिर्मितीला२५वर्षाचा काळ लोटला असून रौप्य महोत्सवी वर्षात स्थानीक लोकप्रतिनिधीना शासकिय वसाहत उभारण्याची मागणीचा विसर पडला आहे.तालुक्याचा विकास राष्ट्रवादी पक्षाने केला.नाही झाला असे नाही  हे श्रेय त्यानांच आहे.परंतू मूलभूत सोयी सुविधां पासून आजही वंचितच आहे.स्मशान शेड,गटारे,फ्लेवरब्लाॅक, रस्ते,समाज मंदीर,स्मशान रोड,साकव बांधण्यात मश्गूल आहेत.या मधून आपला विकास साधत आहेत. तालुक्याच्या दृष्टीने अपेक्षीत विकास होणे गरजेचे असताना दुर्लक्ष केले जात आहे. शासकिय वसाहत नसल्याने सर्वच कर्मचारी शेजारच्या तालुक्यात आपल्या कुटुंबासह रहात आहेत.याचा परिणामबाजार पेठेवर,शैक्षणीक संस्था,शाळांवर झाला आहे.शासकिय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी रहाण्याचे नियमाप्रमाणे बंधनकारक असताना गैरसोयीमुळे राहू शकत नाही. अव्वाच्या सव्वा भाडे भरुन रहात आहेत. शासकिय कार्यालये अजूनहीभाड्याच्या खोलीत आहेत.ग्रामीण रुग्णालय उभारून शोभे ची वास्तू उभारुन विकास केला असल्याच्या वल्गना केल्या जात असुन बंद अवस्थेत आहे.घाईघाईत उद्धाटन करुन काय साधले असा सवाल देखील जनता करीत आहेत. शासकिय वसाहत मधून शासनाचे पैसे शासनाच्याच तिजोरीत गेले असते मात्र याकडेलोकप्रतिनिधींचे, पालकमंत्री,आमदार,स्थानीक लोकप्रतिनिधी पुढारी कार्यकर्ते यांचे दुलर्क्ष आहे.या बाबत वृतपत्राचे माध्यमातून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करुनही दखल घेतली जात नाही. पाच वर्षात  प्रत्येक पक्ष राजकारण खाजवत बसला आहे.साधी तालुका समन्वय समिती मिटींग घेऊन किंवा जनता दरबार घेऊन जनतेच्या समस्या जाणून घेण्याचा औदार्य दाखवले नाही.मात्र तालुका प्रतिनिधी कार्यकर्ते बारीक सारीक कामाची विकास कामांची मागणी तिथे पुरवठा हेच धोरण अवलंबलले दिसून आले आहे.पोलीस वसाहत,शासकिय विश्रामगृह देखील उपेक्षीत आहे.इतर समस्यापण आहेतच उद्योग निर्मिती नसल्याने नोकरीसाठी जनताशहराकडे गेली असून गाव खाली झालेत.हि मोठी समस्या आहे या रौप्य महोत्सवी वर्षा पर्यत होणे अपेक्षीत होते.तरी येत्या नजिकच्याकाळात होतील का?असा सवाल कर्मचारी व जनता जनार्दना कडून केला जातो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here