नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य आणि समाज विकास विभागाद्वारे दिव्यांग सर्वेक्षणाबाबत आशा स्वयंसेविकांचे प्रशिक्षण

नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य आणि समाज विकास विभागाद्वारे दिव्यांग सर्वेक्षणाबाबत आशा स्वयंसेविकांचे प्रशिक्षण

✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो.9373959098

नागपूर :- सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य आणि समाज विकास विभागाद्वारे बुधवारी (ता.१२) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये महात्मा गांधी सेवा संघ यांच्या माध्यमातून दिव्यांग सर्वेक्षणाबाबत आशा स्वयंसेविकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. मनपातर्फे शहरातील दिव्यांगांचे सर्वेक्षण लवकरच सुरु होणार आहे. दिव्यांग सर्वेक्षणाबाबत आशा स्वयंसेविकांचे प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते. मंचावर अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, महात्मा गांधी सेवा संघाचे प्रकल्प संचालक श्री. विजय कान्हेकर,श्री.नीलेश छडवेलकर आदींची उपस्थिती होती.