महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने युवा आक्रोश पदयात्रा व विधान भवन घेराव

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने युवा आक्रोश पदयात्रा व विधान भवन घेराव

✍️ लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994

गडचिरोली :- दिनांक 15 मार्च ते 19 मार्च दरम्यान पुणे ते मुंबई या मार्गावर बेरोजगारी, विद्यार्थ्याच्या समस्या, राजकीय गुन्हेगारी, महिला अत्याचार, शेतकऱ्यांच्या अडचणी, यांसारख्या गंभीर समस्यांवर जनजागृती करण्यासाठी पदयात्रा आयोजित केली आहे. आणि गडचिरोली जिल्ह्यातील विविध मुद्यांना घेऊन गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली.

या पत्रकार परिषदेला गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, आरमारी तालुका अध्यक्ष मिलींद खोब्रागडे, शहर अध्यक्ष सतिश विधाते, नेताजी गावतुरे, विवेक घोंगडे, जनार्धन गावतुरे, जितु मुनघाटे, प्रेमानंद गोंगले, संजय चन्ने, बालू भोयर, अमर भरणे, विकास चिचघरे, प्रांजल धाबेकर, चारुदत्त पोहणे, स्वप्नील बेहरे, कमलेश बारस्कर, गौरव येणप्रेडीवर, विपुल येलट्टीवार, जावेद खान, अनिकेत राऊत, प्रफुल बारासागडे, तेजस कोंडेकर, कुणाल आभारे, आणि मोठ्या संख्येने युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.