आधुनिक युगातही होळी सण परंपरा कायम
✍🏻मंजुळा म्हात्रे ✍🏻
नागोठणे शहर प्रतिनिधी
मो. 9284393448
नागोठणे :- आधुनिक काळाच्या ओघात सर्वच सणांचे रूप पालटत असले तरी स्मार्ट सिटीतील गावांमध्ये सण, उत्सवांची परंपरा पूर्वीप्रमाणे जोपसली जात आहे. ग्रामीण भागात आगरी कोळी बांधव सर्व सनांप्रमाणे होळी हा सण मोठया उत्सहात साजरा करतात. आगरी भाषेत सांगायचे झाले तर होळी म्हणजे ‘हावलूबाय ‘म्हणजेच शिंमगात्सव म्हणून ओळखला जातो. होळी सण म्हंटल की लहानांनपासून मोठ्यांपर्यंत आनंदोत्सव साजरा केला जाणार सण. रायगड जिल्हात होळी सण पारंपारिक पद्धतीने साजरा केला जात असून विशेषता ग्रामीण भागात सावरीच्या झाडाच्या लाकडाची होळी जंगलातून आणली जाते. ही होळी आणण्यासाठी गावातील तरुण मंडळीसोबत जेष्ठ मंडळी सुद्धा जातात. वाजत गाजत गुलालाची उधळण करत होळी आणली जाते. शिमग्याची चाहूल लागताच ग्रामीण भागातील महिला विविध खेळांसोबत होळीची पारंपारिक गाणी गातात ( वारसाची हावलूबाय येतय माहेरा, तिला गौ भाऊ मुळू धारा ) वर्षातून एकदा येणारी होळी तिला तिचा भाऊ ( मुलारी )आणायला जातो त्याचप्रमाणे प्रत्येक सासरवासीन आपल्या भावाची होळी सणानिमित्त आतुरतेने वाट पाहत असते. होळीच्या दिवशी घरातील महिला होळीचा उपवास करतात संध्याकाळी नटूनथटून पारंपारिक वेशभूषा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून विधिवत पूजा केली जाते. रात्री १२ वाजता होळीचा होम रचून गावाच्या पाटलाच्या हातून होळी लावली जाते. या वेळी गावातील जेष्ठ महिला होळीची गाणी गातात. अशा प्रकारे गाणी गात होळी मध्ये नारळ अर्पण केला जातो. तदनंतर या नारळाचा प्रसाद सर्वांना वाटप केला जातो. होळीका दहन केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून विविध खेळ सोंग काढले जातात. अशाप्रकारे मोठया उत्सहात शिंमगात्सव साजरा केला जातो. हल्लीच्याआधुनिक युगात होळीची परंपरा लोप पावत चालली असली तरी ग्रामीण भागात पारंपारिक पद्धतीने होळी सण साजरा केला जात आहे.
