नातीनला शाळेत सोडायला गेलेल्या आजोबाचा लॉयड्स गोयंका शाळे समोर भीषण अपघात
दुचाकी चालकाची प्रकृती चिंताजनक
साहिल सैय्यद /प्रतिनिधि
📲9307948197
घुग्घुस : म्हातारदेवी रोडवरील जीडी गोयंका पब्लिक शाळेत शिकणाऱ्या नातीनला शाळेत सोडायला गेलेल्या तुकाराम गुलधे यांचा शाळेतून परत येत असतांना निलो ईट भट्ठा जवळ कोळसा भरलेल्या चौदाचाकी ट्रकने दुचाकीला धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की ट्रक जाग्यावर पलटी झाला या अपघातात दुचाकीस्वाराला जबर मार लागल्याने प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या परिसरात याशाळेचीच चर्चा असून पालकवर्ग याशाळेत आपल्या मुलांना शिकविण्यासाठी इच्छुक आहे.
मात्र शाळेच्या वतीने सुरक्षेचा अभाव असल्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.
शाळे समोरील रस्त्यावर दोन्ही बाजूने गतिरोधक ( ब्रेकर) आवश्यक आहे.
ही घटना आज सकाळी 8:30 च्या सुमारास घडली. तुकाराम गुलधे (67), सेवानिवृत्त वेकोलि कर्मचारी राम नगर रहिवासी, तुकाराम गुलधे (67) हे त्यांच्या दुचाकी क्रमांक एमएच 34 बीएल 9586 ने मातारदेवी वरून घुग्घुसकडे परतत होते, त्यावेळी एमएच 40 बीजी 1321 क्रमांकाच्या चौदाचाकी कोळसा भरलेल्या ट्रकने एमएच 40 बीजी 1321 या दुचाकीस्वाराला धडक दिली
या अपघातात दुचाकीस्वार तुकाराम गुलधे यांचा पाय मोडला. डोकेला जबर मार,आणि अनेक ठिकाणी जखमा झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे माहिती मिळत आहे.
त्यांच्यावर घुग्घुस राजीव रतन रूग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना तात्काळ चंद्रपूर येथील खाजगी रूग्णालयात रेफर करण्यात आले. घुग्घुस पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
