ग्रेड -१ हेरिटेज झिरो माईल स्टोनचा पर्यटनाच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका सौंदर्यीकरण आणि विकास करणार

ग्रेड -१ हेरिटेज झिरो माईल स्टोनचा पर्यटनाच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका सौंदर्यीकरण आणि विकास करणार

✍🏻मंजुषा सहारे ✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो 9373959098

नागपूर :- सविस्तर बातमी पुढील प्रमाणे भारताच्या केंद्रस्थानी असलेले ग्रेड -१ हेरिटेज झिरो माईल स्टोनचा पर्यटनाच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका सौंदर्यीकरण आणि विकास करणार, असा महत्वपूर्ण निर्णय हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. हेरिटेज संवर्धन समितीचे अध्यक्ष श्री. अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेत बुधवारी (ता.१२) मनपामध्ये बैठक घेण्यात आली. बैठकीत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, समितीच्या सदस्य सचिव श्रीमती लीना उपाध्ये आणि तज्ञ सदस्य उपस्थित होते. माननीय मुख्यमंत्री यांचे सल्लागार श्री. आनंद बंग आभासी पद्धतीने बैठकीमध्ये सहभागी झाले.
बैठकीत नगर रचना विभागाचे सहसंचालक श्री. विजय शेंडे, केंद्रीय पुरातन सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक श्री. सतीश मल्लिक, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक श्री. मयुरेश खंडागळे, डॉ. मधुरा राठोड, डॉ. शुभा जोहरी, सर्वे ऑफ इंडियाचे भूपेन्द्र परमार, मनपा अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, मनपा नगर रचना विभागाचे उपसंचालक श्री. किरण राऊत, सहायक संचालक नगर रचना श्री. ऋतुराज जाधव आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन चे अधिकारी उपस्थित होते.