जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिवंगत आरती ताई बनकर यांचा स्मरनार्थ क्रीडा स्पर्धांचे आयोजन
मुंबई प्रतिनिधी हिरामण गोरेगावकर
मुंबई :- 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन जगात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आजच्या युगात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत हे आपण नेहमीच पाहतो आणि अशा वेळी महिलांचे मनोधैर्य वाढव हाच विचार करून दिवंगत आरती ताई बनकर यांच्या स्मरणार्थ गोवंडी येथे बनकर कुटुंबीयांनी चंद्रमणी बुद्ध विहार या ठिकानी महिलांची क्रीडा स्पर्धा अयोजित करन्यात आली होती .
कार्यक्रमात महिला मोठ्या संख्येने उपस्थीत होत्या यावेळी विजयी महिलांना सोन्याची नत , पैठणी आणि विविध प्रकारची पारितोषिक देऊन सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर आणि संदीप बनकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन रत्ना संदीप बनकर यांनी केले होते.
