आवारे, सुशीलकुमारला सुवर्ण

57

गोल्ड कोस्टः

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या कुस्तीपटूंनी मैदान गाजवले. भारतने कुस्तीत एकूण चार पदकं जिंकली. त्यातदो न सुवर्ण, एक रौप्य आणि एका कांस्यपदकाचा समावेश आहे. महाराष्ट्राचा राहुल आवारे, सुशीलकुमार यांनी पुरुष गटात बाजी मारत सुवर्णपदक पटकावले. तर महिला गटात बबीता फोगटने रौप्य आणि किरणने कांस्यपदक जिंकले. आता पदक तालिकेत १४ सुवर्णपदकांसह भारत तिसऱ्या स्थानावर आहे.

बीडचा पैलवान राहुल आवारेने सुवर्णपदक जिंकले आहे. ५७ किलो वजनी गटात त्यांनी १५ गुण मिळवत कॅनडाच्या स्टीव्हन तकाहाशीचा पराभव केला. स्टीव्हन तकाशीला ७ गुण मिळाले. राहुलने आक्रमक खेळी करत सुरुवीपासूनच लढतीत वर्चस्व निर्माण केलं. यामुळे कॅनडाच्या पैलवानाला संधीच मिळाली नाही. तर ७४ किलो वजनी गटात फ्रिस्टाइल कुस्तीत सुशीलकुमारनेही सुवर्णपदक जिंकले. सुशीलकुमारने दक्षिण आफ्रिकेच्या बोथाचा १०-० अशा गुणांनी पराभव केला. अवघ्या काही सेकंदात सुशीलकुमारने या कुस्तीचा निकाल लावला.