बालाघाट ( म. प्र.) चे खासदार ढालसिंग बिसेन यांनी प्रवासी रेल्वे गाड्या सुरु करण्याची केली मागणी
केन्द्रीय रेल्वे मंत्री मा. अश्विनी कुमार वैष्णव यांना प्रत्यक्ष भेटून दिले निवेदन
✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308726855,8799840838
तुमसर :- भंडारा गोंदिया, बालाघाट, नागपूर जिल्हातील प्रवाशांसाठी तिरोडी, कटंगी, तुमसर, गोंदिया, इतवारी, बालाघाट, दरम्यान प्रवासी एक्सप्रेस गाड्या तात्काळ सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन बालाघाट जिल्हयाचे खासदार मा. ढालसिंग बिसेन यांनी काल केन्द्रीय रेल्वेमंत्री मा. अश्विनी कुमार वैष्णव यांना प्रत्यक्ष भेट देऊन नागपूर, कटंगी, बालाघाट गांदीया या मार्गावर एक्सप्रेस व लोकल गाड्या सुरु करण्याची मागणी खासदार ढालसिंग बिसेन यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी कुमार वैष्णव यांना केली.
रिवा इतवारी एवसप्रेस गाडी आठवड्यातून चार दिवस आहे. ही गाडी बालाघाट, तीरोडी, तुमसर, टाऊन या रेल्वे मार्गावर सुरु करावी अशी मागणी करण्यात आली आहे. जबलपूर, नागपूर बालाघाट तिरोडी तुमसर रेल्वे स्थानकावरून सुपर फास्ट गाड्या सुरु कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. जेनेकरूण प्रवाशांना जाने येणे साठी सुविधा उपलब्ध होईल. मात्र आता सध्या गोंदिया कटंगी ही प्रवासी गाडी सुरु करण्यात आली आहे.या गाडीला तुमसर टाऊन नागपूर पर्यंत पुढे वाढविण्यात यावे व संध्याकाळी परतिच्या मार्गावर ती सुरु करावी अशी दिखील मागणी करण्यात आली आहे. बालाघाट कटंगी तीरोडी – तुमसर टाऊन गोंदिया तुमसर रोड रेल्वे गाडीच्या मार्गाचे विस्तारीकरण करावे. अशी मागणी या दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
प्रवासी गाड्या सुरु करण्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन केंन्द्रीय रेल्वेमंत्री मा. अश्विनी कुमार वैष्णव यांनी खासदार माठालसिंग बिसेन यांना दिले आहे. या कारणामुळे आता या मार्गावरील प्रवाशांमध्ये खुशीचे वातावरण निर्माण होऊन आनंद व्यक्त करत आहेत.