माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कडून राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या निवासस्थानावर केलेल्या भ्याड हल्ल्याविरोधात निषेध मोर्चा.

माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कडून राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या निवासस्थानावर केलेल्या भ्याड हल्ल्याविरोधात निषेध मोर्चा.

माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कडून राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या निवासस्थानावर केलेल्या भ्याड हल्ल्याविरोधात निषेध मोर्चा.
माणगाव :- (सचिन पवार माणगावं तालुका प्रतिनिधी,८०८००९२३०१).

माणगांव : -दि. ८ मार्च रोजी राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून दिनांक ९ मार्च रोजी माणगाव  शहरातील मुंबई गोवा हायवेवरील हॉटेल आनंद भुवन पासून पुढे निजामपूर रेल्वे ब्रिज, मुख्य बाजारपेठ, कचेरी रोड, विकास कॉलेनी ते माणगाव तालुका मध्यवर्ती प्रशासकीय भवन असा निषेध मोर्चा काढण्यात आला.व माणगाव तहसीलदार प्रियांका आयरे-कांबळे यांना सदर हल्ल्यातील आरोपींचा लवकरात लवकर तपास करून कारवाई करावी याकरिता निवेदन देण्यात आले.

यावेळी माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुभाष केकाणे यांच्यासमवेत जिल्हा उपाध्यक्ष शेखर देशमुख, माणगाव तालुका उपाध्यक्ष गणेश चव्हाण, राष्ट्रवादी महिला आघाडी अध्यक्षा संगिता बक्कम,उपाध्यक्षा व संजय गांधी निराधार योजना सदस्या श्रध्दा यादव,रवी मोरे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव दीपक जाधव, माणगाव माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक आनंद यादव,माजी उपनगराध्यक्ष व समन्वय समिती सदस्य रत्नाकर उभारे,दिलीप जाधव,माणगाव शहर अध्यक्ष महामुद धुंदवारे,समन्वय समिती अध्यक्ष इकबाल धनसे,  मा. पंचायत समिती सदस्य शैलेश भोनकर, उणेगाव सरपंच राजू शिर्के,  गोरेगाव विभाग उपाध्यक्ष विलास यादव,महिला आघाडी अध्यक्ष विशाखा यादव,जेष्ठ कार्यकर्त्या तुळसाआक्का पवार,मोरबा माजी सरपंच इकबाल हर्णेकर, इंदापूर उपसरपंच समीर मेहता, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष रुपेश तोडकर,माणगाव शहर अध्यक्ष चेतन गावणकर,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष राजू मोरे,माजी नगरसेवक जयंत बोडेरे,सौरभ बक्कम,सिद्धांत देसाई, यांच्यासह शेकडो राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

यावेळी देश का नेता कैसा हो? शरद पवार जैसा हो..!.भ्याड हल्लेकरांचा निषेध असो,एकच नेता शरद पवार साहेब,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा विजय असो..व एस टी कामगारांचे उच्च न्यायालयातील वकील सदावर्ते यांचा देखील निषेध करण्यात आला.यामध्ये सदावर्ते च्या निषेध..अश्या देखील घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्या ह्या आक्रमक मोर्चाने  व घोषणांनी माणगाव शहरासह माणगाव बाजारपेठ दुमदुमून गेली .