मुल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

मुल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

मुल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

हस्तक वाळके
मुल तालुका प्रतिनिधि

मुल :- मुल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच मुल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय मुल येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात साजरी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमित भाऊ समर्थ यांच्या अध्यक्षतेखाली व नेतृत्वात सदर कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम दीप प्रज्वलन करुन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले ! प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे किसनराव वासाडे, तालुका अध्यक्ष मुल, भास्कर खोब्रागडे शहर अध्यक्ष मुल, ज्ञानेश्वर वाघमारे, तालुका महासचिव मुल, प्रा.प्रभाकर धोटे.
प्रदीप देशमुख, संदीप तेलंग, सतीश गुरूनुले,बालाजी लेनगुरे, दुष्यांत महाडोळे, शेषराव नेवारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रदीप देशमुख यांनी केले तर आभार दुष्यंत महाडोळे यांनी मानले.