त्या नराधम पोलीस पाटलास आजन्म कारावासाची शिक्षा द्या : प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे निवेदन
आशिष चेडगे
साकोली तालुका प्रतिनिधी
8605699863
साकोली : अवघ्या १३ वर्षीय बालिकेशी हैवानवृत्तीच्या पोलीस पाटीलाने अश्लिल चाळे करून माणुसकीला काळीमा फासण्याचा संतापजनक प्रकार दि. ०९ एप्रिलला साकोली तालुक्यातील एका गावी घडला असून अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरणी त्याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात यावी याकरीता प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ साकोली तालुकावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व पोलीस ठाणे साकोली यांना निवेदन देत या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.
गावात महिला बचतगटाची बैठक सुरू असता सायंकाळी ७ वा. पिडीत अल्पवयीन बालिकेच्या आईने मुलीला गावातीलच पोलीस पाटील संजय रामकृष्ण रामटेके वय ३५ यांकडे शिक्का आणन्यास पाठविले. पोलीस पाटील याची पत्नी गावाला गेली होती आरोपी संजय रामटेके याने सुना डाव बघून त्या अल्पवयीन मुलीचा हात पकडून अश्लिल चाळे सुरू केले. मुलगी घाबरली बघून पोलीस पाटलाने मुलीस १०, २०, ५० नंतर ५०० असे पैश्याचे आमिष दाखवित कुठेही हा प्रकार न सांगण्याची धमकी दिली. पिडीताने दूस-या दिवशी आपल्या आईला हा घडलेला प्रकार सांगताच आईवडील यांनी पोलीसांत तक्रार दिली. आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून पोलीसांनी त्यास अटक केली आहे. या मानवतेला काळीमा फासण्याचा संतापजनक प्रकारात त्या हैवानवृत्तीच्या पोलीस पाटीलास आजन्म कारावासाची कडक शिक्षा करावी याबाबद प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ साकोली वतीने निवेदन देऊन घटनेचा तीव्र निषेध केला. निवेदन देतेवेळी जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे, तालुका सचिव प्रा. मनिषा काशिवार, सहसचिव प्रा. चेतक हत्तीमारे, प्रसारण प्रमुख मनोज गजघाट हजर होते.