मौजा सोमलवाडा येथील तरुणाने आपल्याच शेतातील आंब्याच्या झाडाच्या फांदीला नाइलॉन रस्सीने गळफास लाऊन केली आत्महत्या

मौजा सोमलवाडा येथील तरुणाने आपल्याच शेतातील आंब्याच्या झाडाच्या फांदीला नाइलॉन रस्सीने गळफास लाऊन केली आत्महत्या

मौजा सोमलवाडा येथील तरुणाने आपल्याच शेतातील आंब्याच्या झाडाच्या फांदीला नाइलॉन रस्सीने गळफास लाऊन केली आत्महत्या

✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308726855,8799840838

भंडारा :- सविस्तर वृत्त येणेप्रमाणे आहे की,भंडारा जिल्हा साकोली तालुक्यातील मौजा सोमलवाडा येथे दिनांक १० एप्रिल २०२२ रोज रविवारला तरुण युवकाने आपल्याच शेतातील आंब्याच्या झाडाच्या फांदीला नाइलॉन रस्सीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली. क्रिष्णा शालिकराम अतकरी वय २३ वर्षे असे मृतकाचे नाव आहे.
क्रिष्णा अतकरी याने शनिवार च्या रात्री भारनियमनाचे विजपुरवठा सुरु होणार असल्याचे आपल्या कुटूंबीयांना सांगून मोटार सुरु करायला जाणार आहे असे सांगितले होते.
नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी घरची मंडळी झोपून उठली असता क्रिष्णा हा मात्र आपल्या रुममध्ये नव्हता. कदाचीत क्रिष्णा हा शेतावर गेला असेल असा अंदाज घरच्या मंडळींनी लावला.
क्रिष्णाच्या घरची मंडळी ही सकाळी आपल्या शेतात लावलेली भेंडी तोडण्या करीता गेले असता त्यांच्या शेतात असलेला आंब्याच्या झाडाच्या फांदीला नाईलॉन रस्सीने गळफास लाऊन लटकलेल्या स्थितीत क्रिष्णा आढळून आला. या घटनेची नोंद लाखनी पोलीस स्टेशन येथील पोलीसांना केली असून ताबडतोब लाखनी पोलीसांनी घटनास्थळ गाठले.
लाखनी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक मा. माधव वनवे, पोलीस हवालदार गौरीशंकर कडव, प्रकाश न्यायमुर्ते यांनी भेट दिली. व घटनास्थळ पंचनामा केला. नागरिकांच्या मदतीने लटकलेला मृतदेह काढून उत्तरीय तपासणीसाठी लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांचा हाती देण्यात आला.
लाखनी येथील पोलीस निरिक्षक मनोज वाढीवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक दिलीप कुमार घरडे हे पुढील तपास करीत आहे.