नागभिड वि,म, कार्या रात्रीच्या बारा वाजता नागरिक संतापले वीज कार्यालयावर रात्री बारा वाजता धडकले नागरिक

नागभिड वि,म, कार्या रात्रीच्या बारा वाजता नागरिक संतापले वीज कार्यालयावर रात्री बारा वाजता धडकले नागरिक

नागभिड वि,म, कार्या रात्रीच्या बारा वाजता नागरिक संतापले वीज कार्यालयावर रात्री बारा वाजता धडकले नागरिक

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नागभीड –तालुक्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सतत ४ दिवस विद्युत पुरवठा खंडित होत असे. दररोज दोन ते तीन तास रात्रीच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने तालुक्यातील जनता त्रस्त झाली होती. अखेर जनतेचा संयम सुटला आणि शनिवारचा रात्री साडेदहाच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित झाला. एक तास वीजपुरवठा पूर्ववत झाला नव्हता उन्हाळ्याचे दिवस त्यात भरपूर उकाळा आणि डासा च्या त्रासामुळे जनता हैराण होती .सोशल मीडिया वरून संताप व्यक्त केला जात होता. शिवसेनेचे संक्रीय श्री मनोज लडके यांनी काही लोकांना सोबत घेऊन वीज कार्यालय गाठले .हळूहळू नागभिड शहरात हि गोष्ट वार्‍यासारखी पसरली .पाहता पाहता शंभराहून अधिक लोकांचा जमाव जमला वीज कार्यालयाचे मुख्य द्वार खोलून कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला आणि सुरू करण्याची मागणी केली मात्र वीज कर्मचारी कुणाचे ऐकण्यास तयार नव्हते. नागभीड येथील जमाव अधिकच आक्रमक होत होता. दरम्यान पोलिसांच्या मध्यातीने संतप्त जमावाला शांत करण्यात आले.वीज मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आणि सर्व जमाव शांत होऊन घरी परतला.
पण नागभीड शहरातील वीज पुरवठा फक्त पूर्ववत करण्यात आला व ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे असा लक्ष्यात येतच ग्रामीण भागातून सुद्धा ट्रॅक्टरने लोक येऊ लागले . व त्यांच्या संताप बघून वीज विभागाला झूकते माप घेऊन विद्युत पुरवठा पूर्ववत करावा लागला