उन्हाळ्याच्या सुट्टीत मिळतोय या स्मार्टफोनवर भरघोस डिस्काउंट…किंमत बारा हजारांपेक्षा सुद्धा कमी

मीडियावार्ता
१३ एप्रिल

भारतात 12000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या स्मार्टफोनसाठी अनेक पर्याय आहेत. उत्तम कॅमेरा, दीर्घ काळ चालणारी बॅटरी, मोठी स्क्रिन यांसारख्या महत्त्वाच्या फीचर्ससह अनेक स्मार्टफोन्स सध्या बाजारात उपलब्ध आहे. या उन्हाळ्याच्या सुट्टीत फोटो काढण्यासाठी, सिनेमा पाहण्यासाठी, ऑनलाईन गेमसाठी खेळण्यासाठी नवीन स्मार्टफोनच्या शोधात असाल, तर हे स्मार्टफोन नक्की चेक करा.

Samsung Galaxy M13:यात 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले, 48 MP क्वाड रियर कॅमेरा, 13 MP फ्रंट कॅमेरा, 15W फास्ट चार्जिंगसह 5000 mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर आहे. हा फोन 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेजसह येतो.त्याची किंमत सुमारे रु. Amazon वर 11,९९९ इतकी आहे.

Main KV

Oppo A54:या फोनमध्ये 6.51-इंचाचा HD+ डिस्प्ले, 13 MP ट्रिपल रिअर कॅमेरा, 16 MP फ्रंट कॅमेरा, 18W फास्ट चार्जिंगसह 5000 mAh बॅटरी आणि MediaTek Helio P35 प्रोसेसर आहे. 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेजसह असलेल्या या फोनची किंमत सुमारे Amazon वर रु. 11,990. इतकी आहे.

OPPO A54 with 5000mAh Battery, 18W Fast Charge and 128GB ROM

Redmi Note 10S:हा फोन 6.43-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले, 64 MP क्वाड रिअर कॅमेरा, 13 MP फ्रंट कॅमेरा, 33W फास्ट चार्जिंगसह 5000 mAh बॅटरी आणि MediaTek Helio G95 प्रोसेसरसह बाजारात उपलब्ध आहे. फोनमध्ये 6 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज असून त्याची किंमत सुमारे रु. Amazon वर रु 11,999. इतकी आहे.

Xiaomi Redmi 10 Prime:या फोनमध्ये 90 Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाचा FHD+ डिस्प्ले, 50 MP क्वाड रिअर कॅमेरा, 8 MP फ्रंट कॅमेरा, 18W फास्ट चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट असलेली 6000 mAh बॅटरी आणि MediaTek Helio G88 प्रोसेसर आहे. हा फोन 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेजसह उपलब्ध असून त्याची किंमत सुमारे Amazon वर रु 11,९९९ इतकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here