तळा येथे अंगणवाडी सेविकांनी पथनाट्याच्या माध्यमातून केली मतदान जनजागृती

तळा येथे अंगणवाडी सेविकांनी पथनाट्याच्या माध्यमातून केली मतदान जनजागृती

तळा येथे अंगणवाडी सेविकांनी पथनाट्याच्या माध्यमातून केली मतदान जनजागृती

तळा येथे अंगणवाडी सेविकांनी पथनाट्याच्या माध्यमातून केली मतदान जनजागृती

✒️किशोर पितळे :तळा तालुका (प्रतिनीधी)✒️९०२८५५८५२९

तळा : तळा तहसील कार्यालय तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्थापन केलेल्या स्वीप पथका अंतर्गत बुधवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी तळा बाजार पेठेतील बळीचा नाका ते बस स्टॅन्ड या दरम्यान तळा तालुक्यातील अंगणवाडी सेविकांची रॅली काढण्यात आली. यावेळी तहसीलदार श्रीमती स्वाती पाटील, कृषी अधिकारी आनंद कांबळे, एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या श्रीमती दिपाली शेळके, अंगणवाडी सेविका,मदतनीस, तहसीलचे कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते.यावेळी अंगणवाडीसेविकांनी पथनाट्याच्या माध्यमातून मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. स्वीप पथकाच्या नूडल ऑफिसर श्रीमती दिपाली हरिश्चंद्र शेळके एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय तळा, यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविकांमार्फत तळा बाजारपेठ परिसरात मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात आली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता जास्तीत जास्त लोकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता मार्गदर्शन करण्यात आले. संपूर्ण देशभरात निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. भारतातील लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांना अधिक महत्त्व आहे हे अंगणवाडी सेविकांनी पथनाट्याच्या माध्यमातून मतदारांना समजावून सांगितले. तसेच मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी नैतिक दृष्ट्या त्यांना प्रवृत्त केले.यापथनाट्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या.त्यात मिता मोहन कांबळेकर, सरिता महेश चांडीवकर, करिना किशोर मोरे, ऋतुजा राजेंद्र हाटकर, मयुरी महेश शिगवण, जान्हवी जयेश भिंगारे,आनिता नथुराम जाधव, प्रगती गणेश पावशे, ऋतीना महंमद धायरेकर, अजगरी जावेद चिपळूणकर, वनिता गणपत मांडवकर, नचिता नरेश सुर्वे,अनिता यशवंत पतारी, स्वाती सिद्धर्धार्थ गायकवाड, मानसी मंगेश पोळेकर, प्रगती रिसबुड, गितांजली गणेश धाडवे, कोमल केशव वाढवळ,मैथिली महेश शिर्के यांनी उत्कृष्ट अशी भूमिका पार पाडली.
या मतदान जनजागृतीसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. राजाराम महादेव थोरात, प्राध्यापक डी टी आंबेगावे आदी मान्यवर उपस्थित होते. तहसीलदार श्रीमती स्वाती पाटील यांनीमतदारबंधू-भगिनींना मतदान जनजागृतीच्या संदर्भात मार्गदर्शन केले. स्वीप पथकास प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.