श्रीरंग बारणे यांच्या निवडणुकीच्या पत्रकावर भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरेंचा फोटो गायब, भाजपा मध्ये नाराजीचा सूर

✒️रुपेश महागावकर
कर्जत खालापूर प्रतिनिधी
📞93731 57184

कर्जत : मावळ लोकसभा मतदारसंघात युतीमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. मावळ मधील युतीचे उमेदवार बारणे यांच्या निवडणुकीच्या पत्रकावरुण भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरेंचा फोटो गायब आहे.

कर्जत खालापूर मध्ये सुरुवाती पासूनच युतीमध्ये असून देखील शिवसेना आणि भाजपामध्ये मतभेद असल्याचे दिसून येत होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपा यांच्यात दुही असल्याचे बोलले जात आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात युतीमध्ये शिवसेनेकडून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच त्यांनी कर्जतचां दौरा करून स्थानिक नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांनी भाजपा कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांची देखील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. परंतु आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर श्रीरंग बारणे यांनी जाहीर केलेल्या पत्रकावर कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे निवडणूक प्रमुख असलेले किरण ठाकरे यांचा फोटोच कट करण्यात आलाय. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या पत्रकावर फोटो नसल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमट आहे. तर बारणे यांच्या कार्यप्रणालीवर काही भाजप कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत.
कर्जत तालुक्यात सध्या किरण ठाकरे यांच्या माध्यमातून भाजपा पक्ष वाढीस मदत झाली आहे. अनेकांनी भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केलाय. तर त्यांच्या माध्यमातून मतदार संघात अनेक विकासकामे देखील मार्गी लागली आहेत. त्यामुळे किरण ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग कर्जत खालापूर मध्ये आहे. असे असताना किरण ठाकरे यांना डावलून श्रीरंग बारणे यांनी भाजपची नाराजी ओढवून घेतली आहे. आता ही नाराजी मतदानात परिवर्तित झाल्यास श्रीरंग बारणे यांना मोठी किंमत मोजावी लागू शकते हे मात्र नक्की.