उकरूळ ग्रामपंचायत मध्ये कचरा टाकू नये या फलकाच्या खाली कचराकुंडी
✒️संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333
कर्जत :- कर्जत तालुक्यातील एका गावाची ग्रामपंचायत असलेल्या उकरूळ ग्रामपंचायत स्वच्छतेचा पुरस्कार करणारी ग्रामपंचायत समजली जाते. मात्र नव्याने नागरीकरण झालेल्या भागात नागरी सुविधा देण्यात ग्रामपंचायत प्रशासन कमी पडताना दिसत आहे.जागोजागी कचरा साठून ग्रामपंचायतीची प्रतिमा मालिन होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी ग्रामपंचायत कडून येथे कचरा टाकू नये असे फलक लावले आहेत. मात्र त्याच जागा कचरा कुंड्या बनल्या आहेत असे असताना ग्रामपंचायत प्रशासन कमी पडले असल्याचे दिसून येत आहे.
पूर्वी कर्जत तालुक्यातील स्वच्छ आणि सुंदर ग्रामपंचायत म्हणून उकरूळ हि ग्रामपंचायत ओळखली जायची.या एका गावाच्या ग्रामपंचायत परिसरात रेल्वे स्थानक जवळ असल्याने मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. मोठ्या इमारती उभ्या राहिल्याने ग्रामपंचायतीचा महसूल देखील वाढला आहे.मात्र त्यानंतर देखील ग्रामपंचायत प्रशासनाने नागरी सुविधा पुरवत नसल्याचे दिसून येत आहे.इमारती उभ्या राहिल्या आहेत आणि तेथे रहिवाशी राहायला देखील आले आहेत,मात्र त्या रहिवाशाना कचरा टाकण्यासाठी सध्या कचरा कुंड्या देखील अनेक ठिकाणी नाहीत. रहिवाशी कचरा कुंड्या नसल्याने कचरा रस्त्याच्या कडेला टाकून देतात आणि त्यामुळे ग्रामपांचायत मधील अनेक रस्त्यांच्या बाजूला अनधिकृतपणे कचरा कुंड्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे अखेर ग्रामपंचायत प्रशासनाला ग्रामपंचायत मधील रहिवाशान्नी कुठेही कचरा यासाठी सूचना फलक लावावे लागले आहेत.
मात्र अशाच सूचना फलक यांच्या आजुबाजुला कचरा कुंड्या निर्माण झाल्या आहेत.ग्रामपंचायत प्रशासन यांच्याकडून तेथे कचरा टाकू नये,कचरा टाकल्यास कारवाई केली जाईल असे फलक लावले आहेत. तेथेच कचरा टाकला जात असल्याने स्थानिक रहिवाशी देखील या बेकायदेशीर कचरा कुंड्यांमुळे नाराज झाले आहेत. त्यात गावातील रस्त्यांच्या कडेला असलेल्या कचरा कुंड्या मधील कचरा जाळण्यात येत असल्याने श्वसनाचे आजार जडले असून त्या अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या कचराकुंड्या कधी हटविणार? ग्रामपंचायत कडे नाही.त्यामुळे उकरूळ ग्रामपंचायत मधील स्थानिक ग्रामस्थ आणि नागरी भागातील रहिवाशी यांच्यासाठी या कचरा कुंड्या मोठी समस्या बनून राहिल्या आहेत.