बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन च्या माईनिंग अँड माईन सर्वेयींग विभागाचा निरोप समारंभ संपन्न
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 12 एप्रिल
बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतनच्या माईनिंग अँड माईन सर्वेयींग विभागाच्या वतीने शनिवार, १२ एप्रिल ला निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात माईनिंग अँड माईन सर्वेयींग च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात आपल्या कॉलेजचा शेवटचा दिवस साजरा केला. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या फेयरवेल पार्टी मध्ये विद्यार्थ्यांनी रॅम्पवर कॅटवॉक, नृत्य, भाषण आणि त्यांच्या अभिनयाच्या जादूने सर्वांचे मनोरंजन केले. गीत-गायन, नृत्य संगीत अश्या विविध कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थी विद्यार्थ्यांनी कॉलेज मध्ये घालवलेला वेळ व आपला अनुभव सगळ्यांसमोर व्यक्त केला. या प्रसंगी सर्वोदय महिला मंडळाच्या अध्यक्षा नील. सी. बजाज, सचिव ममता बजाज, मुख्य कार्यपालन अधिकारी भरत बजाज, आणि बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन चे प्राचार्य विजय कोयाळ, उपप्राचार्य दिनेश चौधरी यांनी सगळ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना या निरोप समारंभात त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व समोरच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी माईनिंग अँड माईन सर्वेयींग विभागाचे विभाग प्रमुख प्रा. एम. एम. डांगे, विभागाचे शिक्षक व शिकेत्तर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम आयोजनासाठी परिश्रम घेतले.