जिल्हाधिका-यांनी दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन होऊनही, राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिका-यांच्या दौऱ्यात कार्यवाही नाही.

51

जिल्हाधिका-यांनी दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन होऊनही, राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिका-यांच्या दौऱ्यात कार्यवाही नाही.

जिल्हाधिका-यांनी दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन होऊनही, राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिका-यांच्या दौऱ्यात कार्यवाही नाही.
जिल्हाधिका-यांनी दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन होऊनही, राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिका-यांच्या दौऱ्यात कार्यवाही नाही.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
माहूर : कोरोनाचा उपद्रव थोपविण्यासाठी शासनाने विविध अटी व शर्थी लागू करून ताळेबंदी घोषीत केली आहे.त्यामु़ळे उद्योग-धंद्यासह सर्व प्रकारची कामे ठप्प झाल्याने हातावर पोट असलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून नाईलाजास्तव अनेकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी गावठी दारू काढण्यावर भर दिला असल्याची बाब दि.3 एप्रिल रोजी सायंकाळी माहूर पोलीसांनी टाकलेल्या धाडीने उघड झाली आहे.दि.11 मे रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकाऱ्यांनी आपल्या चमूसह तालुक्यातील बार,बियर शॉपी व देशी दारू दुकानाला भेटी दिल्या,परंतु शासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असतांनाही कुणावरही कार्यवाही केली नसल्याने उलट -सुलट चर्चेला पेव फुटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नांदेड यांनी घालून दिलेल्या नियमांचे अनुषंगाने देशी- विदेशी दारू विक्री करणाऱ्या परवाना धारक दुकानदारांना स.8 ते रात्री 8 वाजे पर्यंत परवाना धारक व्यक्तीला घर पोहच सेवा देणे अनिवार्य आहे.घरपोहच सेवा देणाऱ्या कर्मचा-याने 15 दिवसाच्या आत कोविड चाचणी करून निगेटिव्ह अहवाल आल्याचे प्रमाण पत्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात दाखल करून ओळख पत्र घेणे गरजेचे असून ठरवून दिलेल्या कीमतीवरच दारू विक्री करणे बंधनकारक आहे.या शिवाय सदरची दुकाने बंद ठेवून व्यवहार होणे गरजेचे आहे.मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसविलेले असतानाही संबंधीत विभागाचे अधिकारी या दुकानदारांना एकत्र बोलावून चर्चा करून कार्यवाही न करताच आपले चांगभले करून निघून गेल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

अद्याप पर्यंत कुठल्याही बार मालकाने व संबधित दुकानदाराने घरपोहच सेवा देणाऱ्या कर्मचा-यांची कोविड चाचणीसाठीची यादी दिली नसल्याचे माहूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.व्यंकटेश भोसले यांनी सांगितले.

माझ्याकडे दारू विक्रेत्यांनी कुठलीही यादी दिली नाही, तसेच किनवटला काम असल्याचे सांगून काही लोकांनी तसे चाचणी अहवाल दि.21एप्रील रोजी नेल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र वाई बाजार चे वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीनिवास हुलसुरे यांनी दिली. या बाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी बोधनवाड यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तो स्वीकारला नाही.