युवा सेनेतर्फे वाफारा मशीन चे वितरण; गरीब गरजू व घरी राहून उपचार करणाऱ्या कोविड रुग्णांना दिला मदतीचा हात.

त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
भद्रावती :- सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे आहे की, संपूर्ण देशा सह राज्यात कोविड आजाराने थैमान घातले असून चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा कोविड आजाराने ग्रासले आहे. त्यातच जिल्ह्यात तसेच तालुक्यातील गरीब गरजू लोकांना दवाखान्याचा होत असलेला खर्च पूरक नसल्याने घरीच होम कोरोनरटाइम होऊन रुग्णाला उपचार घेणे सुरू आहे. अशा गरीब गरजू लोकांना युवा सेना चंद्रपूर तर्फे आवश्यक असलेल्या वाफारा मशीनचे भद्रावती तालुक्यात तसेच शहरात वितरण करण्यात आले. यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुखक हर्षल दादा शिंदे, समन्वयक तथा नगरसेवक पप्पू सारवण, युवासेना पदाधिकारी अमोल कोल्हे, कल्याण मंडळ उमेश काकडे, शैलेश पारेकर अंकित चुनारकर, सौरभ महाजन आणि युवासैनिक उपस्थित होते. या अगोदर सुद्धा हर्षल दादा शिंदे युवा सेना तर्फे ऑटोरिक्षा द्वारे नागरिकांना कोविड लस घेण्याकरिता घेण्याकरिता नागरिकांच्या घरून ते ग्रामीण रुग्णालय ते नागरिकांच्या घरी पोहोचवून देणे असा उपक्रम राबविण्यात आले होते. आता त्यांनी वापरा मशीनचे वितरण केल्याने युवा सेना जिल्हा चंद्रपूर तसेच हर्षल दादा शिंदे यांचे सर्वीकडे कौतुक होत आहे.