दुर्गापूर वॉर्ड क्रमांक ३ ला मिळणार विद्युत मिटर. ग्रा.प. सदस्य राजेंद्रजी मेश्राम यांच्या ४ वर्ष्याच्या पाठपुराव्याला आले यश.

45

दुर्गापूर वॉर्ड क्रमांक ३ ला मिळणार विद्युत मिटर. ग्रा.प. सदस्य  राजेंद्रजी मेश्राम यांच्या ४ वर्ष्याच्या पाठपुराव्याला आले यश.

तब्बल ९८ लाख ४८ हजार ९५१ रुपयांना महावितरण विभागाची मंजुरी.

दुर्गापूर वॉर्ड क्रमांक ३ ला मिळणार विद्युत मिटर. ग्रा.प. सदस्य  राजेंद्रजी मेश्राम यांच्या ४ वर्ष्याच्या पाठपुराव्याला आले यश.`
दुर्गापूर वॉर्ड क्रमांक ३ ला मिळणार विद्युत मिटर. ग्रा.प. सदस्य  राजेंद्रजी मेश्राम यांच्या ४ वर्ष्याच्या पाठपुराव्याला आले यश.

संदीप तूरक्याल, चंद्रपूर शहर प्रतिनिधी
दुर्गापूर :- मौजा दुर्गापूर येथील जुना सर्वे क्र. १६८ व १६९ मधील ८.९९ हे. आर. जमिनीवर दुर्गापूर वार्ड क्रमांक ०३ असुन मागील ३०-३५ वर्षांपासून मानवी वस्ती बसलेली आहे. परंतु या जमिनीसंदर्भात न्यायालयीन प्रकरण असल्याने ही वस्ती मानवी सुविधांपासून वंचित होती. या जागेवरील घरांवर वीज व विद्युत मीटर द्यावे या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य मा. राजेंद्रजी मेश्राम हे मुद्देनिहाय लेखी पाठपुरावा जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हा प्रशासन व महावितरण विभागाशी सतत करीत राहिले.

महाराष्ट्र शासनाच्या मंत्री मंडळाने सदर जमीन मानवी गावठाण म्हणून विस्तार करणे करीता संपादीत करण्याच्या निर्णय दिनांक १७ जानेवारी २०१८ रोजी घेऊन प्रशासकीय मान्यता देखील दिली. त्या शासन निर्णयाला अनुसरून श्री मेश्राम यांनी सतत लेखी पाठपुरावा केला यांच्या विस्तृत व कायदेशीर पाठपुराव्याची जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन मा. जिल्हाधिकारी महोदयांनी महावितरण विभागाला सदर वार्ड क्रमांक ३ च्या जागेचा सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते त्या अनुषंगाने महावितरण विभागाने संपूर्ण सर्वेक्षण करून या जागेवर विद्युत प्रवाह जोडणी करिता महावितरण च्या अधीक्षक अभियंता यांनी दिनांक १२ मार्च २०२१ला कार्यालयीन पत्र क्रमांक ०६८२ काढून तब्बल ९८ लाख ४८ हजार ९५१ रुपयांना तांत्रिक मान्यता देखील दिली. या बाबतचे पत्र सुद्धा दुर्गापूर ग्रामपंचायतच्या सरपंच यांना महितीस्तव मार्च २०२१ ला महावितरण विभागाने पाठविले.

राजेंद्रजी मेश्राम यांच्या कायदेशीर पाठपुराव्यानेच दुर्गापूर वार्ड क्रमांक ३ च्या नागरिकांना न्याय मिळाला असुन येत्या ३-४ दिवसांत विद्युत जोडणी संदर्भात काम सुरू होणार आहे. यामुळे वॉर्ड क्रमांक ०३ च्या संपूर्ण नागरिकांनी राजेंद्रजी मेश्राम, दुर्गापूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच अमोल भाऊ ठाकरे, सरपंच सौ. पूजा मानकर, उपसरपंच प्रज्योत पुणेकर, माजी सदस्य सौ. सपना गणवीर यांचे आभार मानले.