धक्काबुक्की केल्याने इसमाचा मृत्यू , भद्रावती तालुक्यातील जेना येथे घटना.

त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
भद्रावती :- शुल्लक कारणावरून झालेल्या धक्काबुक्की मध्ये इसमाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री दरम्यान घडली या प्रकरणी मुलगा व वडिलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश परचाके वय 50 वर्ष राहणार जीना असे मृतकाचे नाव आहे तर यातील बबन परचाके वय 60. शरद परचाके वय 40 वर्षे असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी व मृतक हे नातेवाईक असून दोघेही समोरा समोर राहतात दोघेही वेगवेगळ्या पक्षाचे नेतृत्व करत असून ग्रामपंचायत येथे झालेल्या आर्थिक कारभाराबाबत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत होते घटनेच्या दिवशी असाच प्रकार घडल्याने वडील व मुलाने सुरेश परचाके यास धक्काबुक्की केली यात सुरेश हा खाली पडला त्यानंतर त्याला घरच्या लोकांनी घरी नेले व तो चहा पीत असताना त्याची अचानक प्रकृती बिघडल्याने त्याचा तिथेच मृत्यू झाला. मृतकाच्या मुलाच्या तक्रारीवरून भद्रावती पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.