वर्धा जिल्ह्यात आणखी 5 दिवस कडक लॉकडाऊन.

57

वर्धा जिल्ह्यात आणखी 5 दिवस कडक लॉकडाऊन.
 

वर्धा जिल्ह्यात आणखी 5 दिवस कडक लॉकडाऊन.
वर्धा जिल्ह्यात आणखी 5 दिवस कडक लॉकडाऊन.

आशीष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी ✒
वर्धा दि,12:- जिल्ह्यात मागील आठवड्यात कोरोना रुग्णांची आणि मृत्यूची संख्या वाढत असल्यामुळे आणि नागरिक लॉकडाऊन असतानाही अकारण रस्त्यावर फिरत असल्यामुळे कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा सकारात्मक परिणाम दिसत असून रुग्ण संख्या आणि मृत्यू दर खाली आला आहे. हा मृत्युदर आणखी कमी करण्यासाठी आणि संसर्ग साखळी तुटण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आणखी 5 दिवस कडक निर्बंध वाढवले आहेत.

नागरिकांनी जिल्ह्यातील मृत्यू संख्या आणि रुग्ण संख्या कमी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 8 मे सकाळी 7 पासुन 13 मे सकाळी 7 पर्यंत जिल्ह्यात कडक निर्बंध लावले होते. त्यात 18 मे सकाळी सात वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.