महाड midc पोलिसांची “कत्तलखाना” कारवाईत तीन बैल कटिंगसाठी वापरलेले ऐवजासह दोन आरोपी ताब्यात
दोन दिवसांमध्ये दोन कारवाई करणाऱ्या कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.मारुती आंधळे यांचे नागरिकांकडून कौतुक
✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९
महाड(रायगड):-महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.९/५/२०२२ रोजी मौजे राजेवाडी फाटा ईसार पेट्रोल पंप समोर नाकाबंदी करण्यात आली असता सकाळी ६:३० ते ७:०० वाजताच्या दरम्यान पिकप जीप क्रमांक एम एच ०८ एच ६५२८ ही गाडी खेड कडून महाडच्या दिशेने येत असताना नाका-बंदी दरम्यान थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपी क्रमांक १) हनिफ अब्दुल गणी कोंडेकर वय ४२ वर्षे रा. पालघर मोहल्ला ता. मंडणगड जि. रत्नागिरी २) मोहम्मद बालमियाॅ चोगले वय ४५ रा. भोस्ते मोहल्ला ता. खेड जि.रत्नागिरी यांना ताब्यात घेतले असता चौकशीदरम्यान आरोपींनी वहूर मोहल्ला ता.महाड येथे काही दिवसांपूर्वी कटिंग साठी जनावरे दिल्याची कबुली दिल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मारुती आंधळे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी महाड श्री. निलेश तांबे यांच्या आदेशाने मौजे वहूर येथे घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता गोठ्यामध्ये तीन बैल, कटिंगसाठी वापरलेले ऐवजासह एक टेम्पो दोन आरोपी १) तौफिक शबीर झटाम २) आश्रफअली लाडगे दोघेही रा.वहूर मोहल्ला ता.महाड यांना पंचनामा करून ताब्यात घेण्यात आले यावेळी पोलीस पाटील आणि काही ग्रामस्थ हजर होते तसेच नागरिकांनी जागरूकता दाखवित अशा प्रकारच्या घटना गांभीर्याने घेऊन त्वरित स्थानिक पोलीसांना कळविण्याचे आव्हाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. मारुती आंधळे यांनी केले