नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार: चालत्या गाडीला भर रस्त्यात लागली अचानक आग

त्रिशा राऊत

नागपूर ग्रामीण प्रतिनिधी 

मो 9096817953

नागपूर: नागपुरच्या रामदासपेठ सेंट्रल बाजार रोडवर असलेल्या क्रीम्स रुग्णालयासमोर शुक्रवारी सकाळी रस्त्यावरून जाणाऱ्या कारमधून अचानक धूरयेऊ लागला.मात्र, चालकाला काही समजण्याआधीच गाडीच्या बोनेटमधून आगीच्या ज्वाळांना सुरुवात झाली. घाईघाईत कार चालकाने आपली कार रस्त्याच्या मधोमध थांबवली आणि जीव वाचवण्यासाठी गाडीतून उतरून अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे.

अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गाडीचा बराचसा भाग जळून खाक झाला होता. आयटी पार्कमधील एका खासगी कंपनीत काम करणारा मनीष मरघाटे नावाचा ३५ वर्षीय ड्रायव्हर ही कार चालवत असून शुक्रवारी सकाळी मेडिकल चौकातून ऑफिसला जाण्यासाठी कार घेऊन निघाला असताना हा अपघात झाला.चालत्या कारमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचे वृत्त आहे. मात्र, या घटनेनंतर काही काळ रस्त्याच्या दुतर्फा जाम झाला होता आणि घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूचा जाम खुला करून वाहतूक सुरळीत केली.

वेळोवेळी गाडीची सर्व्हिसिंग आवश्यक

चालत्या गाडीला आग लागण्याच्या अनेक घटना ऐकल्या, पाहिल्या आहेत. यात बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग नसल्याने, वाहने लॉक झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागल्याचेही समोर आले आहे. केवळ जुन्याच नव्हे तर नवीन गाड्यांमध्ये आग लागण्याच्या अनेक घटना घडतात. आग लागण्यामागे अनेक घटक कारणीभूत असतात. यामध्ये देखभाल, ड्रायव्हिंग स्टाईल यासारख्या काही गोष्टींचा समावेश आहे.

गाडीचे तापमान तपासणे आवश्यक आहे. त्याचवेळी, कारमध्ये जास्त ऍक्सेसरीज स्थापित करू नयेत. यामुळे कारच्या बॅटरीवर भार पडू शकतो आणि आग लागू शकते आणि वायरिंगचे नुकसान होऊ शकते. साऊंड सिस्टीममध्ये कोणतीही दुरुस्ती किंवा बदल अधिकृत सेवा केंद्रात केले पाहिजेत. त्यामुळे वायरिंगमध्ये निष्काळजीपणा होत नसून वेळेवर वाहनाची देखभाल करणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here